Join us
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे; उद्धव ठाकरेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 14:48 IST

आज शिवसेना भवन येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

मुंबई- आज शिवसेना भवन येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 'आम्ही काल निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णया विरुद्ध सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करण्यात यावे अशी मागणीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 

'निवडणूक आयोगाने आम्हाला जी कागदपत्र सांगितली ती आम्ही त्यांना दिली. त्यांनी सदस्य संख्या सांगितली ती सर्व दिली. पहिल्यांदा एक निकष लावला, पुन्हा सदस्य संख्येचा निकष लावला. तुम्हाला हाच निकष लावायचा होता तर आम्हाला प्रतिज्ञा पत्र का द्यायला लावली, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

"....तर 2024 ची निवडणूक ही शेवटची ठरू शकते"; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

'आम्ही कार्यकारणीची झालेल्या सभेची सीडी दिली. यात आयोग म्हटले कव्हरींग लेटर दिलेलं नाही. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय आम्हाला मान्य नाही, निवडणुकी पद्धतीने आयोग नेमला पाहिजे. आताच निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे,  अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. 

"....तर 2024 ची निवडणूक ही शेवटची ठरू शकते"; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. पण या धक्क्यातून खचून न जाता पक्षाला सावरण्यासाठी आता उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन केलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरण्याचा प्रयत्न केला असला तरी हा पूर्व नियोजित कट आहे. ते ठाकरे नाव चोरू शकत नाहीत. मी एका गोष्टीसाठी भाग्यवान आहे... बाळासाहेब आणि मां च्या पोटी जन्माला आलो. ते भाग्य दिल्लीवाले देऊ शकत नाहीत" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे. "जी परिस्थिती शिवसेनेवर लादली ती देशातील कोणत्याही पक्षावर लादू शकतात. हे थांबलं नाही तर 2024 ची निवडणूक ही शेवटची ठरू शकते. आता जागे न झाल्यास हुकुमशाही. निवडणूक आयोगाचा निकाल अयोग्य आहे" असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदेभारतीय निवडणूक आयोग