सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 19:48 IST2025-05-29T19:41:50+5:302025-05-29T19:48:48+5:30

सीबीआयने लोअर परळयेथील पारपत्र सेवा केंद्र म्हणजेच पासपोर्ट कार्यालयालीत कार्यालय सहाय्यक आणि एका दलालाला भष्टाचार प्रकरणी अटक केली.

CBI raids passport office; officer, broker arrested while taking bribe | सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक

सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक

लोअर परळयेथील पारपत्र सेवा केंद्र म्हणजेच पासपोर्ट कार्यालयालीत कार्यालय सहाय्यक आणि एका दलालाला भष्टाचार प्रकरणी सीबीआयने अटक केली. गेल्या काही दिवसापासून राज्यात एसीबीने भ्रष्टाचारविरोधात मोहिम सुरू केली आहे. आता या मोहिमेत सीबीआयनेही मोठी कारवाई केली. पासपोर्ट कार्यालयातील एका अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात अटक पकडले. 

सुपेकरांच्या अडचणीत वाढ; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला

मिळालेल्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांवर आधारित पासपोर्ट काढून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. आरोपींनी अनेक पारपत्र बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवल्याचा आरोप आहे. तसेच, ७ बनावट पासपोर्ट अर्ज सीबीआयला सापडले आहेत. सध्या त्यांची पडताळणी सुरू आहे. कनिष्ठ पारपत्र सहाय्यक अक्षय कुमार मीणा व दलाल भावेश शांतीलाल शहा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. 

मीणा हे कनिष्ठ पारपत्र सहाय्यक असून लोअर परळ येथील पारपत्र सहाय्यक केंद्रावर पडताळणी अधिकारी म्हणून काम करत होते. सीबीआयाने या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तक्रारीनुसार, २०२३-२४ या काळात संबंधित  मीणा व खासगी दलला शहा यांनी संगनमत करून कट रचला होता. दोघेही पारपत्र मिळवून देण्यासाठी लाच घेत असल्याचा आरोप आहे.
 

Web Title: CBI raids passport office; officer, broker arrested while taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.