अमिताभ गुप्ता प्रकरणी सीबीआय चौकशी करा, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 02:13 AM2020-05-19T02:13:09+5:302020-05-19T06:02:37+5:30

गुप्ता यांनी अशी शिफारस केल्याचे समोर आल्यानंतर वादळ उठले होते. शासनाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते आणि अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास शासनाने सांगितले होते.

CBI probe into Amitabh Gupta case: Devendra Fadnavis | अमिताभ गुप्ता प्रकरणी सीबीआय चौकशी करा, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

अमिताभ गुप्ता प्रकरणी सीबीआय चौकशी करा, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

Next

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात एस बँक घोटाळ्यातील आरोपी वादग्रस्त वाधवान बंधूंना महाबळेश्वरला जाण्यासाठी ट्रांझिट पास देण्याची शिफारस गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी कोणाच्या इशाऱ्यावरून केली होती याची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.
गुप्ता यांनी अशी शिफारस केल्याचे समोर आल्यानंतर वादळ उठले होते. शासनाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते आणि अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास शासनाने सांगितले होते. सैनिक यांना दिलेल्या यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे क्लीन चिट देत गुप्ता यांना पुन्हा त्याच पदावर रुजू करून घेण्यात आले आहे.
यावर फडणवीस म्हणाले की गुप्ता यांनी कोणाच्यातरी इशाऱ्यावरून ट्रान्झिट पाससाठीचे पत्र दिले होते हे स्पष्टच आहे. गुप्ता यांना घाईघाईने पुन्हा त्याच पदावर सामावून घेण्यात आले हे सगळेच संशयास्पद आहे.

Web Title: CBI probe into Amitabh Gupta case: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.