मुंबई : एका ज्येष्ठ नागरिकाला एक कोटी रुपयांचा आयकर भरण्यासाठी नोटीस पाठवल्यानंतर ते प्रकरण बंद करण्यासाठी पाच लाखांची लाच मागणाऱ्या आयकर अधिकाऱ्याविरोधात सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल केला आहे. तो दिल्लीतील आहे. संजय कुमार असे त्याचे नाव आहे.
संबंधित ज्येष्ठ नागरिकाला १ कोटी रुपयांचा कर भरणा करण्याची नोटीस जारी केल्यानंतर संजय कुमार या व्यक्तीने त्यांच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठविला आणि ही रक्कम तुम्ही भरू नका, मी प्रकरण बंद करून देतो, असे सांगत पाच लाख रुपयांची लाच मागितली. पण तडजोड करून दोन लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. ज्येष्ठ नागरिकाने सीबीआयकडे लेखी तक्रार दिली.