दक्षिण मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 07:46 IST2024-04-16T07:46:23+5:302024-04-16T07:46:39+5:30

उद्धवसेनेने दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे. 

Candidacy for Varsha Gaikwad likely from South Central Mumbai | दक्षिण मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी? 

दक्षिण मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी? 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड इच्छुक असून, त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी या जागेची अदलाबदल केली जाण्याबाबत चर्चा सुरू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी सध्या चार मतदारसंघामध्ये उद्धवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत, तर अन्य दोन जागा काँग्रेससाठी सोडण्यात आल्या आहेत. उद्धवसेनेने दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे. 

मात्र, या जागेसाठी वर्षा गायकवाड आग्रही आहेत. त्यांनी नुकतीच दिल्लीवारी केली. त्यावेळी पक्षश्रेष्ठींबरोबर या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही जागा काँग्रेसला देऊन त्या बदल्यात उत्तर मुंबईची जागा उद्धवसेनेला दिली जाण्याची चर्चा आहे. या जागेवरून उद्धवसेनेकडून विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

Web Title: Candidacy for Varsha Gaikwad likely from South Central Mumbai