वाईट अनुभव...! उत्साहात मतदानाला आले , मात्र यादीत नावच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:45 IST2026-01-15T12:44:21+5:302026-01-15T12:45:04+5:30
संबंधित घोळासंबंधी पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता मतदार यादीत नाव नाही याचा अर्थ त्यांना मतदान करायचा अधिकार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

वाईट अनुभव...! उत्साहात मतदानाला आले , मात्र यादीत नावच नाही
मुंबई : मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी मतदारांनी ठिकठिकाणी सकाळपासूनच रांगा लावायला सुरुवात केली. अशाच उत्साही मतदाराना बोरिवलीच्या प्रभाग १७ मध्ये मात्र वाईट अनुभव आला. ध्रुव शाह आणि त्यांच्या कुटुंबातील तीन जणांचे नावच मतदार यादीत नसल्याचे समोर आले आहे. विधानसभेला याच प्रभागात मतदान केलेले असताना यावेळी मात्र मतदार यादीत नाव नाही असे कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ध्रुव शाह यांचे स्वतःचे, पत्नीचे आणि आई-वडिलांचे असे चौघांचे यादी नाव यादीत नसल्याचे समोर आले आहे.
संबंधित घोळासंबंधी पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता मतदार यादीत नाव नाही याचा अर्थ त्यांना मतदान करायचा अधिकार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेकडून दोन महिन्यापूर्वी मतदार यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोणाचेही नाव अधिक करण्याचा किंवा डिलीट करण्याचा अधिकार प्रशासनाला नाही. त्यामुळे मतदारांची आपली नावे आवश्यक होते असे त्यांनी म्हटले.
इमारतीतील आणखी १५ जणांची नावे गायब -
ध्रुव शाह राहत असलेल्या बोरिवलीतील कामधेनू इमारतीतील आणखी पंधरा जणांची नावे गायब असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा आणि विधानसभेला मतदानाचा हक्क बजावूनही आपल्याला आता पालिका निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारला जात आहे यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे