खड्ड्यात पडल्याने कॅबचालकाच्या बरगड्या तुटल्या, अंतर्गत दुखापतीमुळे प्लीहा काढण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:09 IST2026-01-30T13:08:32+5:302026-01-30T13:09:01+5:30

Mumbai Accident News:   बोरीवली पूर्वेकडील कार्टर रोड क्रमांक ७ येथे रस्ते दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून कॅब चालक परमानंद मौर्या (४६, रा. स्टार प्लाझा इमारत, कार्टर रोड) पडून गंभीर जखमी झाल्याची घटना २८ डिसेंबर २०२५ ला घडली. परमानंद यांच्या चार बरगड्या तुटल्या असून, अंतर्गत दुखापतीमुळे प्लीहा काढावी लागली.

Cab driver's ribs broken after falling into a pothole, internal injuries require spleen removal | खड्ड्यात पडल्याने कॅबचालकाच्या बरगड्या तुटल्या, अंतर्गत दुखापतीमुळे प्लीहा काढण्याची वेळ

खड्ड्यात पडल्याने कॅबचालकाच्या बरगड्या तुटल्या, अंतर्गत दुखापतीमुळे प्लीहा काढण्याची वेळ

- गौरी टेंबकर-कलगुटकर 
मुंबई -  बोरीवली पूर्वेकडील कार्टर रोड क्रमांक ७ येथे रस्ते दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून कॅब चालक परमानंद मौर्या (४६, रा. स्टार प्लाझा इमारत, कार्टर रोड) पडून गंभीर जखमी झाल्याची घटना २८ डिसेंबर २०२५ ला घडली. परमानंद यांच्या चार बरगड्या तुटल्या असून, अंतर्गत दुखापतीमुळे प्लीहा काढावी लागली. खोदकाम करताना बीएससीपीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सुरक्षेच्या पुरेसा उपाययोजना न केल्याने ही घटना घडली आहे.

मौर्या यांच्या तक्रारीनुसार, २८ डिसेंबरला मध्यरात्री १२:४५ वाजण्याच्या सुमारास बोरीवलीतील हेमराज शाळेसमोर कॅब उभी केल्यावर ते आपल्या इमारतीकडे गेले. तेथे गेटसमोर खोदलेल्या खड्ड्यात ते पडले. कुटुंबीयांनी त्यांना बोरीवली पूर्वेकडील खासगी रुग्णालयात दाखल केले.

कंपनी कर्मचारी व कंत्राटदारावर गुन्हा
- एफआयआरनुसार, १९ जानेवारीला पोलिसांनी मौर्या यांचा जबाब नोंदविल्यानंतर उपचाराचा खर्च करण्याचे आश्वासन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिले. त्यामुळे तेव्हा त्यांनी तक्रार केली नाही.
- मौर्या यांच्या भावाने 'बीएससीपीएल'चे सुपरवायझर तिवारी यांना ३० डिसेंबरला घटनेची माहिती दिली असता त्याने उलट उत्तर दिले. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी २८ जानेवारीला कंपनीचे कर्मचारी व कंत्राटदार मानव शहा, प्रदीप पांडे, यश मेहता व तिवारी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

रुग्णालयात उपचार सुरू
तपासणी, एक्स-रे, सीटी स्कॅन व एमआरआय चाचणीअंती डाव्या बाजूच्या चार बरगड्या तुटल्याचे व मणक्याला मार लागल्याचे निदर्शनास आले. पुढील उपचारासाठी त्यांना मीरा रोड येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये हलवण्यात आले.

"खोदकामाच्या ठिकाणी सूचनाफलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स किंवा धोक्याचे दिवे नसल्याने अंधारात मी तोल जाऊन खड्ड्यात पडलो. तेथील पाणीपुरवठा पाइपलाइनवर पडल्यामुळे मला गंभीर दुखापत झाली." - परमानंद मौर्या, तक्रारदार

परमानंद मौर्या यांच्या बरगड्यांवर शस्त्रक्रिया केली असून, प्लीहा निकामी झाल्याने ती काढून टाकण्यात आली. या उपचारासाठी सहा लाख रुपयांचा खर्च आला असून, डॉक्टरांनी चार महिने आरामाचा सल्ला दिला आहे. - रिटा मौर्या, तक्रारदाराची बहीण

Web Title : गड्ढे में गिरने से कैब चालक घायल, पसलियाँ टूटीं, प्लीहा निकाली गई

Web Summary : बोरीवली में एक कैब चालक बिना बाड़ वाले निर्माण गड्ढे में गिर गया, जिससे उसकी पसलियाँ टूट गईं और आंतरिक चोटें आईं, जिसके लिए प्लीहा को निकालना पड़ा। बीएससीपीएल इंफ्रास्ट्रक्चर की लापरवाही से दुर्घटना हुई। पुलिस ने कंपनी के कर्मचारियों और ठेकेदार के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Cab Driver Injured in Pothole, Ribs Fractured, Spleen Removed

Web Summary : A cab driver in Borivali fell into an unfenced construction pit, suffering fractured ribs and internal injuries requiring spleen removal. Negligence by BSCPL Infrastructure led to the accident. Police have registered a case against the company's employees and contractor.