सीएए, एनपीआर, एनआरसी कायद्याला वानखेडे स्टेडियमवर विद्यार्थ्यांनी 'असा' केला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 17:42 IST2020-01-14T17:39:48+5:302020-01-14T17:42:00+5:30
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला एकदिवसीय सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे.

सीएए, एनपीआर, एनआरसी कायद्याला वानखेडे स्टेडियमवर विद्यार्थ्यांनी 'असा' केला विरोध
मुंबई: नागरिकत्त्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्ट, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायद्याच्याविरोधात देशभरात विविध ठिकाणा आंदोलने करण्यात आली. महाराष्ट्रात देखील केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केली. या आंदोलनात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. त्यातच आज मुंबईतील वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी टी- शर्ट परिधान करुन नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) या कायद्याला विरोध दर्शविला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला एकदिवसीय सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यादरम्यान मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नो सीएए, नो एनपीआर, नो एआरसी असं लिहलेलं टी शर्ट परिधान करुन सीएए, एनपीआर आणि एनआरसी कायद्याला विरोध दर्शविला आहे.