Join us

मेट्रो-३ चे भुयारीकरण मिठी नदीखालून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 02:29 IST

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावर पूर्णपणे भुयारी मार्ग असणाऱ्या मेट्रो-३ प्रकल्पाच्या महत्त्वाच्या टप्प्याचे काम येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरू होईल.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावर पूर्णपणे भुयारी मार्ग असणाऱ्या मेट्रो-३ प्रकल्पाच्या महत्त्वाच्या टप्प्याचे काम येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरू होईल. मेट्रो-३ प्रकल्पातील वांद्रे ते कुर्ला संकुल जंक्शनअंतर्गत येणाºया मिठी नदीखालून हे भुयारीकरण करण्यात येईल.सध्या मुंबईत मेट्रो-३ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गातील एकूण १७.५ किलोमीटरच्या भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो-३ हा प्रकल्प अंदाजे २०२१ मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, अशी शक्यता आहे. यातील वांद्रे ते कुर्ला संकुल जंक्शन या महत्त्वाच्या टप्प्यात भुयारीकरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पादरम्यान असलेल्या मिठी नदीखालून या कामाला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. आॅक्टोबर २०१९ मध्ये हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.बीकेसी सेंटर ते धारावी सेंटर हा एकूण १.८२५ किलोमीटर लांबीचा पल्ला असेल. यात धारावी सेंटर ते बीकेसी सेंटर यांना जोडण्यासाठी मिठी नदीखालून तीन भुयारे खोदण्यात येतील, अशी माहितीदेखील मेट्रो-३ चे प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या प्रकल्पामुळे मुंबईला एक नवीन ओळख मिळणार असल्याचे बोलले जात आहे़कोलकातानंतर मेट्रोसाठीचे दुसरे भुयारकोलकाता भुयारी मेट्रो प्रकल्पामध्ये हुगळी नदीखालून झालेले भुयारीकरण हे भारतातील ‘नदीपात्राखालील’ पहिले भुयार आहे. मुंबई मेट्रो-३ चे मिठी नदीखालील भुयार हे अशा प्रकारचे दुसरे भुयार असणार आहे.>असे होणार कामबीकेसी सेंटर ते धारावी सेंटर हाएकूण १.८२५ किलोमीटर लांबीचा पल्ला असेल.मिठी नदीखालून होणाºया भुयारीकरणाचे काम न्यू आॅस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) पद्धतीने होईल. यात बीकेसी ते धारावी असे भुयार पाण्याखालून असेल. काही भाग नदीपात्रात खारफुटीमध्ये तर काही भाग पाण्याखाली असेल.टेराटेक कंपनीने बनविलेल्या २ टीबीएम मशीन ‘गोदावरी ३’ व ‘गोदावरी ४’ अप आणि डाऊन मार्गावर भुयार खणतील. अर्थ प्रेशर बॅलन्स ही विशेष कार्यप्रणाली असलेल्या टीबीएम या भुयारीकरणात कार्यरत असणार आहेत.याशिवाय नॅटम या एका विशिष्ट पद्धतीद्वारे एक स्वतंत्र भुयारदेखील खोदण्यात येईल. या पद्धतीमध्ये टप्प्याटप्प्याने भुयार खोदले जाते.

टॅग्स :मेट्रो