व्यापाऱ्याचा पावणेदोन कोटींचा हिरा हाँगकाँगमधील कंपनीकडे, बीकेसी पोलिसांकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 07:51 IST2025-04-02T07:48:11+5:302025-04-02T07:51:19+5:30

Crime News: ऑनलाइन पोर्टलवरून पसंत पडलेला पावणेदोन कोटींचा जीआयए प्रमाणीत हिरा बघण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत तो अदलाबदल  करत व्यापारी पसार झाला. या हिऱ्याचा शोध सुरू असतानाच तो हिरा हाँगकाँगस्थित कंपनीकडे असल्याचे व्यापाऱ्याला समजले. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे.

Businessman's diamond worth Rs 2.5 crores goes to Hong Kong company, BKC police files case | व्यापाऱ्याचा पावणेदोन कोटींचा हिरा हाँगकाँगमधील कंपनीकडे, बीकेसी पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्यापाऱ्याचा पावणेदोन कोटींचा हिरा हाँगकाँगमधील कंपनीकडे, बीकेसी पोलिसांकडून गुन्हा दाखल

 मुंबई - ऑनलाइन पोर्टलवरून पसंत पडलेला पावणेदोन कोटींचा जीआयए प्रमाणीत हिरा बघण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत तो अदलाबदल  करत व्यापारी पसार झाला. या हिऱ्याचा शोध सुरू असतानाच तो हिरा हाँगकाँगस्थित कंपनीकडे असल्याचे व्यापाऱ्याला समजले. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार, बीकेसी पोलिसांनी याप्रकरणी हाँगकाँग स्थित ट्रस्ट ज्वेल्स कंपनीचे प्रितेश शाह, व्यापारी घनश्याम तागडिया, भरत गंगानी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

नेपिन्सी रोड परिसरात राहणारे सेतूल मोदी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी गुन्हा नोंदवला. त्यांची भागीदारीत इम्पेक्स नावाची कंपनी असून, बीकेसीतील भारत डायमंड बोर्स येथे कार्यालय आहे. हिरे बाजारातील व्यापारी आणि ब्रोकर यांना हिरे देत व्यवहार पूर्ण करतात. तसचे ऑनलाइन पोर्टलद्वारे ही हिऱ्याचे व्यवहार होतात. अशाच एका व्यवहारात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

‘जीआयए’ संदर्भात आला ई-मेल
१४ मार्च रोजी त्यांना आलेल्या एका ई-मेलमध्ये त्यांचा हिरा ट्रस्ट ज्वेल्स या हाँगकाँग स्थित कंपनीचे प्रितेश एच शाह यांनी जीआयए प्रमाणीत करण्यासाठी पाठवल्याचे समजले. अखेर कंपनीची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

असा झाला प्रकार उघड
८ फेब्रुवारी रोजी कर्मचारी कल्पेश चौधरी  यांच्या मोबाइलवर घनश्याम तागडिया यांच्या नावाने एकाने कॉल केला होता. त्याचे कार्यालयही भारत डायमंड बोर्स येथे असल्याचे सांगून  ऑनलाइन पोर्टलवर विक्रीसाठी ठेवलेला जीआयए प्रमाणीत हिरा आवडल्याचे सांगून दाखवण्यासाठी घेऊन येण्यास सांगितले.  चौधरी कामात व्यस्त असल्याने त्यांनी ब्रोकर अमरीश भयानीला हिरा घेऊन पाठवले. त्यांनी घनश्यामच्या कार्यालयात जाऊन हिरा दाखवला. हिऱ्याची पाहणी झाल्यानंतर पुन्हा कार्यालयात आणून दिला.
२६ फेब्रुवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून घनश्यामने हिऱ्याची अदलाबदल केल्याचे सांगून हिऱ्याची तपासणी करण्यास सांगितले. तपासणीत तो नैसर्गिक नसून सी.व्ही.डी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर घनश्यामचा फोन बंद लागला. अखेर, त्यांनी घनश्याम यांचे कार्यालय गाठले. मात्र, ते कार्यालय देखील बंद दिसून आले. चौकशीत घनश्याम आणि त्याचा साथीदार भरत गंगानी दोघेही पसार झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. 
 

Web Title: Businessman's diamond worth Rs 2.5 crores goes to Hong Kong company, BKC police files case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.