Join us  

तृतीयपंथींसाठी १.५ कोटी ₹ देणाऱ्या अक्षय कुमारला उद्योगपती आनंद महिंद्रा म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 10:14 PM

बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारने भारतात तृतीयपंथींसाठी घरे बांधण्याकरीता आज 1.5 कोटी रुपये दान केले आहे.

बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारने भारतात तृतीयपंथींसाठी घरे बांधण्याकरीता आज 1.5 कोटी रुपये दान केले आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.  तृतीयपंथीयांसाठी हक्काचं घर बांधण्याकरता अक्षय कुमारने मदत केल्यानंतर सर्वस्तरावरुन त्याचे कौतुक करण्यात येत आहे. देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा आणि महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन अक्षय कुमारचे कौतुक केले आहे.

आनंद महिंद्रा म्हणाले की, हा माझ्यासाठी सोमवारचा बूस्टर शॉट आहे. तसेच तुझ्याकडे उपेक्षित स्थिती बदलण्याची ताकद असल्याचे सांगत आनंद्र महिंद्रा यांनी अक्षय कुमारचे कौतुक केले आहे.

दाक्षिणात्य दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांची ‘लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्ट’ गेल्या पंधरावर्षांपासून शिक्षण, लहानमुलांसाठी घर, दिव्यांग डान्सरनां  मदत आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी ही स्वयंसेवी संस्था काम करते. तसेच लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्ट 15व्या वर्षांत पाऊल ठेवत असल्याची माहिती राघव लॉरेन्स यांनी दिली. तसेच लक्ष्मी बॉम्बच्या शुटिंग दरम्यान अक्षयने या शेल्टर होमबद्दल ऐकले आणि या प्रोजेक्टबद्दल एकल्यानंतर तातडीने  दीड कोटी रुपये दान करणार असल्याचे मला सांगितले. जे कुणी मदतीसाठी पुढे येतात त्यांना मी देवासारखा मानतो. त्यामुळे अक्षय कुमार माझ्यासाठी देवासमान आहे. मी त्याचेआभार मानतो असं राघव  लॉरेन्स यांनी सांगितले. 

अक्षय कुमार लवकरच ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षयसह अभिनेते अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघव लॉरेन्स या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून 5 जून 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडभारतमहिंद्रा