बुलेट ट्रेन ताशी धावणार ३२० किमी; मुंबई ते अहमदाबाद मार्गावर जपानसारखे ट्रॅक बांधणार

By सचिन लुंगसे | Published: May 4, 2024 06:34 PM2024-05-04T18:34:30+5:302024-05-04T18:36:06+5:30

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर ताशी ३२० किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे.

Bullet train will run 320 km per hour Japan-like tracks will be built on the Mumbai to Ahmedabad route | बुलेट ट्रेन ताशी धावणार ३२० किमी; मुंबई ते अहमदाबाद मार्गावर जपानसारखे ट्रॅक बांधणार

बुलेट ट्रेन ताशी धावणार ३२० किमी; मुंबई ते अहमदाबाद मार्गावर जपानसारखे ट्रॅक बांधणार

मुंबई : मुंबई ते अहमदाबाद मार्गावर ताशी ३२० किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे, त्यासाठी ट्रॅक उभारण्यासाठी लागणाऱ्या मशिन्स भारतात बनविण्यात आल्या आहेत. काही मशीन जपानवरून आणल्या आहेत. जसे जपानमधील बुलेट ट्रेनसाठी ट्रॅक उभारले आहेत तसेच ट्रॅक आता मुंबई-अहमदाबाद दरम्यान उभारण्यात येणार आहेत.

बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी अत्याधुनिक मशिनरीसह यांत्रिक ट्रॅक उभारणी केली जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानी शिंकानसेन ट्रॅक सिस्टिमवर आधारित जे-स्लॅब ट्रॅक सिस्टिम असणार आहे. भारतात पहिल्यांदाच जे-स्लॅब गिट्टीलेस ट्रॅक सिस्टिमचा वापर केला जात आहे. गुजरात आणि डीएनएचमध्ये ३५२ किमीच्या अलाइनमेंटसाठी वायडक्टवर ७०४ किमी ट्रॅक आणि साबरमती आणि सुरत येथे दोन बुलेट ट्रेन डेपो टाकण्यात येणार आहेत. 

ट्रॅक इन्स्टॉलेशनची संपूर्ण प्रक्रिया अत्याधुनिक आहे. गुजरातमध्ये ट्रॅक टाकण्याचे काम सुरू आहे. प्रकल्पासाठी सुरत आणि वडोदरा येथे ३५ हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त रेल्वे आणि ट्रॅक बांधकाम यंत्रांचे तीन संच आले आहेत. मशीनच्या ताफ्यात रेल्वे फीडर कार, ट्रॅक स्लॅब टाकण्याची कार, सीएएम लेइंग कार आणि फ्लॅश बट वेल्डिंग मशीनचा समावेश आहे. या मशिनचे एकत्रीकरण, चाचणीचे काम सुरू असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने दिली.

६० किलोंच्या फ्लॅशची वेल्डिंग
२५ मीटर लांबीच्या ६० किलो वजनाच्या रेल्वेला फ्लॅश बट वेल्डिंग मशीन वापरून वेल्डिंग केले जाते. जेणेकरून वायडक्टवर ट्रॅक कन्स्ट्रक्शन बेसजवळ २०० मीटर लांबीचे पॅनेल तयार होतील. प्रीकास्ट ट्रॅक स्लॅब वायडक्टवर उचलले जातात. लोड केले जातात आणि ट्रॅक टाकण्याच्या ठिकाणी हलविले जात असून या पद्धतीने काम सुरू आहे.

Web Title: Bullet train will run 320 km per hour Japan-like tracks will be built on the Mumbai to Ahmedabad route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.