Join us

'म्हैस दोनवेळा दूध देते, म्हणून संध्याकाळीही दूधविक्रीला परवानगी द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 12:10 IST

एकेकाळी काँग्रेसकडून मंत्रीपद भूषवलेल्या कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांच्या कामाचं कौतुक केलंय. “तुमच्या सक्षम आणि कुशल नेतृत्वात राज्य सरकार आणि महानगरपालिका महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे

मुंबई - राज्यात सध्या 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे, त्यात आता आणखी 15 दिवसांची भर पडली असून राज्य सरकारने 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे, केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. दूध, भाजीपाला, किराणा आणि वैद्यकीय सेवांनाच सूट देण्यात आली आहे. मात्र, दूध व किराणा दुकानांना केवळ सकाळच्या वेळेतच परवानगी आहे. आता, दूध विक्रेत्यांना सकाळच्या वेळेतचही परवानगी द्या, अशी मागणी उत्तर भारतीयांचे नेते कृपाशंकर सिंह यांनी केली आहे. 

एकेकाळी काँग्रेसकडून मंत्रीपद भूषवलेल्या कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांच्या कामाचं कौतुक केलंय. “तुमच्या सक्षम आणि कुशल नेतृत्वात राज्य सरकार आणि महानगरपालिका महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मी राज्य सरकार, बीएमसी प्रशासनाचे या कौतुकास्पद प्रयत्नांसाठी अभिनंदन करतो. तसेच काही सूचनाही सुचवतो” असे म्हणत कृपाशंकर सिंह यांनी दूध विक्रेत्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. “महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. दूध उत्पादन गोष्टींकडे मी लक्ष वेधू इच्छितो. म्हैस दोनदा दूध देत असते आणि हे ताजे दूध सर्व दुकानदारांना पाठवले जात असते. कोणताही रिटेलर संध्याकाळी दूध घेत नाही, कारण दुकानं बंद असतात. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि दूध संध्याकाळी विकायला परवानगी द्यावी” अशी मागणी सिंहं यांनी पत्राद्वारे केली आहे. 

पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा सन्मान द्या

या कोरोना काळात वृत्तपत्र आणि टीव्ही मीडिया पत्रकार मोठं काम करत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना योद्ध्यांचा सन्मान द्यावा, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली. महाराष्ट्र सरकारने एप्रिलमध्ये ऑटो रिक्षावाल्यांना 107 कोटीचे पॅकेज घोषित केले होते त्यानुसार प्रत्येकी 1500 रुपये रिक्षा चालकांना मिळणार होते ते अजून मिळाले नाहीत. ते लवकर मिळावेत, अशी मागणीही कृपाशंकर सिंग यांनी केली. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुख्यमंत्रीदूध पुरवठादूधमुंबईकाँग्रेस