थोडक्यात

By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:04+5:302015-08-31T00:24:04+5:30

Briefly | थोडक्यात

थोडक्यात

>गर्दीच्या ठिकाणीच टॅक्सी थांबा
मुंबई: चर्नी रोड पूर्व ते भुलेश्वर बाजार या दरम्यान शेअर टॅक्सी सेवा उपलब्ध आहे. भुलेश्वरला ज्या ठिकाणी टॅक्सी थांबतात तिथूनच बसेस, गाड्यांची रहदारी सुरु असते. या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येत असले तरीही रस्ता मोठा नाही. या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळ येथे गर्दी असते. टॅक्सी चालक मध्येच थांबत असल्यामुळे पादचार्‍यांना त्याचा त्रास होतो.
........................
बस थांब्यावर गाठोडी
मुंबई: मुंबई सेंट्रल बस थांब्याच्या छतावर फेरीविक्रेते आपले सामान गाठोड्यात बांधून ठेवतात. मुंबई सेंट्रलचा बसथांबा हा आतल्या बाजूस आहे. यामुळे अनेकदा प्रवासी हे पुढे रस्त्यावरच थांबतात. बस थांब्याचा वापर जास्त होत नसल्यामुळे दुपारी काही लोक इथेच झोपतात. आणि आपले सामान या बस थांब्यावर ठेवतात.
............................
पदपथावर थाटले घर
मुंबई: दादर पूर्व परिसरातील पदपथावरुन पादचार्‍यांना चालायलाच मिळत नाही. टिळक पुलाच्या खाली असलेल्या पदपथावर रस्त्यावर राहणार्‍यांनी आपला सगळा संसार थाटला आहे. या ठिकाणीच ते स्वयंपाक करतात, भांडी धुतात. पुलाच्या खाली असल्यामुळे पावसाचा कोणताही त्रास होत नाही. पण, यांच्यामुळे पादचारी, रहिवाशी त्रस्त आहेत.
...........................

Web Title: Briefly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.