पुलांची फेरतपासणी करणाऱ्या सल्लागार पॅनेलची मुदत संपली; जुन्या सल्लागारांना मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:55 AM2019-10-31T00:55:36+5:302019-10-31T00:55:56+5:30

पालिका प्रशासनाचा निर्णय

Bridges Advisory Panel Expires; | पुलांची फेरतपासणी करणाऱ्या सल्लागार पॅनेलची मुदत संपली; जुन्या सल्लागारांना मुदतवाढ

पुलांची फेरतपासणी करणाऱ्या सल्लागार पॅनेलची मुदत संपली; जुन्या सल्लागारांना मुदतवाढ

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पूल चांगल्या स्थितीत असल्याचा खोटा अहवाल देणाºया सल्लागाराची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याऐवजी नवीन स्ट्रक्चरल आॅडिटरची नियुक्ती केल्यानंतर आता सल्लागार पॅनेल नव्याने उभे राहणार आहे. यासाठी विलंब होण्याची शक्यता असल्याने जुन्याच पॅनेलला मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

त्यामुळे नवीन सल्लागारांची टीम तयार होईपर्यंत मुंबईतील सर्व पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्गांचा बांधकाम सल्ला आणि फेरतपासणीचे काम जुन्या समितीमार्फतच होणार आहे. मुंबईतील पुलांचे ऑडिट करणाºया आठ सल्लागारांच्या पॅनेलवरून त्याची हकालपट्टीही करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट केले. यासाठी शहर विभागातील पुलांच्या आॅडिटचे काम मे. स्ट्रकटवेल या कंपनीला देण्यात आले. या कंपनीने आपला अहवाल नुकताच पालिका प्रशासनाला सादर केला आहे.

दरम्यान, या पॅनेलची मुदत २३ ऑगस्ट २०१९ रोजी संपुष्टात आली आहे. मात्र नवीन तांत्रिक सल्लागार उपलब्ध नाहीत. पूल विभागात तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमी असल्याने पुलांची दुरुस्ती, पुनर्बांधणीच्या कामात अडचण निर्माण होऊ शकते.

ऑडिटरवर खटला
१४ मार्च २०१९ रोजी सीएसएमटी येथील हिमालय पादचारी पूल कोसळून सात लोकांचा मृत्यू झाला. स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये हा पूल स्ट्रक्चरल आॅडिटर डी.डी. देसाई यांनी चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे या दुर्घटनेनंतर या आॅडिटरला अटक होऊन त्याच्यावर खटला चालविण्यात येत आहे.

Web Title: Bridges Advisory Panel Expires;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.