Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीपार्क स्मशानभूमीला हवा मोकळा श्वास; अंत्यसंस्कारांचा अतिताण कमी करण्यासाठी मनसेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 20:03 IST

शिवाजीपार्क स्मशानभूमीत कोरोना आणि इतर आजारांमुळे होणाऱ्या नैसर्गिक मृत्यूमुळे दररोज 20 ते 25 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेले व नैसर्गिक कारणाने मृत्युमुखी झालेल्या मृतदेहांचे अंत्यसंस्काराचा अतिताण शिवाजीपार्क समाशंभूमीवर पडत आहे. त्यातून होणाऱ्या धूरांमुळे श्वसनांचे विकार जडत आहेत शिवाजीपार्क स्मशानभूमीला मोकळा श्वास घेता यावा यासाठी मनसेने सोमवारी आंदोलन केले.

कोरोनामुळे दगवलेले सर्वाधिक मृतदेह मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर-शिवाजीपार्क येथील भागोजीशेठ किर स्मशानभूमीत आणले जात आहेत याचा अतिरिक्त ताण या स्मशानभूमीवर पडत आहे. स्मशाणभूमीवर पडणारा हा ताण कमी करण्याची मागणी करत सोमवारी शिवाजीपार्क येथे सोशल डिसटन्स पाळत शांततेत आंदोलन करण्यात आल्याचे मनसेचे दादर-माहीम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

निवासी क्षेत्रात असलेल्या या स्मशानभूमीत मृतदेहांवरील अंत्यसंस्कारानंतर मोठ्या प्रमाणात धूर होत असल्याने परिसरातील नागरिकांना काही दिवसांपासून श्वसनांचे, खोकला, डोकेदुखी डोळे चूरचुरणे हे त्रास उद्भवत होते याबाबत रहिवाशांनी तक्रारी देखील केली होती.

शिवाजीपार्क स्मशानभूमीत कोरोना आणि इतर आजारांमुळे होणाऱ्या नैसर्गिक मृत्यूमुळे दररोज 20 ते 25 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले. ज्या रुग्णालयात कोरोंना रुग्नाचा मृत्यू होईल त्या भागातील स्मशानभूमीत मृतदेह ताब्यात घेतल्यापासून दीड तासात अंत्यसंस्कार करण्याचा नियम पालिकेने केला आहे मात्र बहुसंख्य ठिकाणी हा नियम धुडकवण्यात येत आहे.

मुंबईतील सेव्हन हिल्स, भाभा रुग्णालय, लीलावती, कस्तुरबा, जगजीवनदास, जी. टी रुग्णालयातील दगवलेल्या कोरोंना रुग्णांचे मृतदेह त्या भागातील स्मशानभूमीत घेऊन न जाता शिवाजीपार्क स्मशानभूमीत आणले जात आहेत त्यामुळे याचा ताण या स्मशानभूमीवर पडत असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

एकापाठोपाठ एक मृतदेह जाळले जात असल्याने चिमणीतून बाहेर फेकला जाणारा धूर स्मशानभूमी बाहेर लागलेल्या रुग्णवाहिकाच्या रांगा परिसरात कुठेही फियरणारे रुग्णवाहिकानचे चालक व मृतांचे नातेवाईक इतरत्र पडलेले हँड गलोवज, मास्क यामुळे परिसर दूषित झाला आहे.

कोरोना मृतांवर आपापल्या विभागातील स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्याचे आदेश पालिकेने द्यावेत अन्यथा अंत्यसंस्कार रोखावे लागतील असा इशारा किल्लेदार यांनी दिला आहे.

टॅग्स :मनसेराज ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या