Join us

BREAKING: मुंबईत कांदिवलीतील इमारतीत भीषण आग, अग्निशमन दल दाखल; महापौरही पोहोचल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 21:58 IST

मुंबईतील कांदिवली येथे हवासा हेरिटेज नावाच्या १५ मजल्याच्या इमारतीत १४ व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत

मुंबई-

मुंबईतील कांदिवली येथे हवासा हेरिटेज नावाच्या १५ मजल्याच्या इमारतीत १४ व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री साडेआठ वाजता आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 

कांदिवली पश्चिमेकडील मथुरादास मार्गावरील हंसा हेरिटेज नावाच्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. इमारत एकूण १५ मजल्यांची आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील आगीची माहिती मिळताच तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या आहेत. इमारतीच्या संपूर्ण १४ व्या मजल्यावर आग पसरली असून ५ जण अडकल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. 

टॅग्स :आगअग्निशमन दलमुंबईकिशोरी पेडणेकर