Join us

Breaking : मन्नत बंगल्याजवळील इमारतीला लागली आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 21:48 IST

Fire at 14th floor : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्या मन्नत या बंगल्यानजीक जिवेश ही २१ मजली इमारत आहे.

मुंबई - वांद्रे पश्चिमेकडील बॅण्ड स्टॅण्ड येथे असलेल्या मन्नत बंगल्याजवळील गगनचुंबी इमारतीच्या १४ व्या मजल्यावर आग लागली आहे. आज रात्री ८ वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्या मन्नत या बंगल्यानजीक जिवेश ही २१ मजली इमारत आहे. या इमारतीच्या १४ व्या मजल्यावर आगीने पेट घेतला आहे. 

आग लागलेल्या इमारतीनजीकच सुपरस्टार शाहरुख खानचा मन्नत नावाचा बंगला आहे. जिवेश इमारतीच्या १४ व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी ८ फायर इंजिन आणि ७ जम्बो पाण्याचे टँकर आहेत. लेव्हल २ ची ही आग असल्याचं अग्निशमन दलाकडून माहिती देण्यात आली आहे. 

टॅग्स :आगअग्निशमन दलमुंबई