Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील ८९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवापदके जाहीर, वाचा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 10:15 IST

Mumbai News: भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ११८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवापदके जाहीर करण्यात आली आहेत.

मुंबई/नवी दिल्ली - भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ११८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवापदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना 'वीरता पदक', उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे 'राष्ट्रपती पदक' पोलीस दलातील ४ अधिकारी आणि सुधारात्मक सेवा विभागातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील ४०, अग्निशमन सेवेसाठी ४, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील ३, सुधारात्मक सेवेतील ५ या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत दरवर्षी पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील कार्यासाठी शौर्य आणि सेवापदके दिली जातात.

महाराष्ट्राला मिळालेल्या विविध श्रेणीतील पदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादीवीरता पदक (जीएम)- पोलीस सेवा१. अमोल नानासाहेब फडतरे, सहायक पोलीस निरीक्षक, २. वासुदेव राजम मडावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, ३. मधुकर पोचाय्या नैताम, सहायक पोलीस उपनिरीक्षक, ४. संतोष वसंतराव नैताम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, ५. कै. सुधाकर बिताजी वेलादी नाईक पोलीस कॉन्स्टेबल (मरणोत्तर), ६. विलास मारोती पोतंत नाईक पोलीस कॉन्स्टेबल, ७. विश्वनाथ सन्यासी सडमेक नाईक पोलीस कॉन्स्टेबल, ८. ज्ञानेश्वर सदाशिव फाडणे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, ९. दिलीप वासुदेव सड्रेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, १०. रामसू देवू नरोटे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, ११. आनंदराव बाजीराव उसेंडी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, १२. राजू पंडित चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल, १३. अरुण कैलास मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल, १४. नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल, १५. मोहन लच्छू उसेंडी, पोलीस कॉन्स्टेबल, १६. संदीप गणपत वसाके, पोलीस कॉन्स्टेबल, १७. कैलास देबू कोवासे, पोलीस कॉन्स्टेबल, १८. हरिदास महारू कुल्येती, पोलीस कॉन्स्टेबल, १९. किशोर चंती तलांडे, पोलीस कॉन्स्टेबल, २०. अनिल रघुपती आलम, पोलीस कॉन्स्टेबल, २१. नरेंद्र दशरथ मडावी, पोलीस कॉन्स्टेबल, २२. आकाश अशोक उईके, पोलीस कॉन्स्टेबल, २३. स्वर्गीय करे इरपा आग्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोत्तर), २४. राजू मासा पुसाली, पोलीस कॉन्स्टेबल, २५. महेश दत्तुजी जकेवार, पोलीस कॉन्स्टेबल, २६. रुपेश रमेश कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल, २७. मुकेश शंकर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल, २८. योगेंद्रराव उपेंद्रराव सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल, २९. घिस्सू वांजा आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल, ३०. अतुल भगवान मडावी पोलीस कॉन्स्टेबल, ३१. विश्वनाथ लक्ष्मण मडावी पोलीस कॉन्स्टेबल

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (पीएसएम)१. महेश उदाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त, २. बाळकृष्ण मोतीराम यादव, पोलीस उपायुक्त, ३. सायरस बोमन इराणी, सहायक पोलीस आयुक्त, ४. विठ्ठल खंडुजी कुबडे, सहायक पोलीस आयुक्त

सुधारात्मक सेवा१. विजय परब, सुभेदार, २. राजू विठ्ठलराव हेटे, हवालदार

सुधारात्मक सेवा१. अशोक शिवराम करकर, अधीक्षक, २. गोविंद केशव राठोड, अतिरिक्त अधीक्षक, ३. राजेंद्र भाऊसाहेब धनगर, हवालदार, ४. सुनील भाऊसो लांडे, हवालदार, ५. प्रल्हाद महिपती शिंदे, हवालदार

अग्निशमन सेवा१. हरिश्चंद्र गिरकर, उप मुख्य अधिकारी, २. दामोदर वनगड, अधिकारी, ३. कांचन पाटील, ड्रायव्हर ऑपरेटर, ४. काशिनाथ राजनाथ मिश्रा, अग्रगण्य फायरमन

नागरी संरक्षण व होमगार्ड१. गंगाधर वखाजी बुरकुड, प्लाटून कमांडर, २. राजेंद्र मधुकरराव बनसोड, प्लाटून कमांडर, ३. नागेश्वरराव अल्कोंदिया पोददाली, प्लाटून कमांडर

उत्कृष्ट सेवेसाठी पदक (एमएसएम)१. राजीव वीरेंद्र कुमार जैन, पोलीस महानिरीक्षक, २. सुधीर कल्ल्या हिरमठ, पोलीस महानिरीक्षक, ३. शीला दिनकर साहिल, पोलीस अधीक्षक, ४. मोहन मुरलीधर दहीकर, पोलीस अधीक्षक, ५. पुरुषोत्तम नारायण कराड, पोलीस अधीक्षक, ६. किरण जितेंद्रसिंह पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ७. नीलम प्रशांत वाहळ, पोलीस उपाधीक्षक, ८. अविनाश शंकरराव शिळीमकर, निरीक्षक, ९. गजानन रामराव शेळके, पोलीस उपअधीक्षक, १०. महेश रमेश तावडे, सहायक पोलीस आयुक्त, ११. विजय मारोतीराव माहुलकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, १२. समीर नारायण साळुंके, सहायक पोलीस आयुक्त, १३. पराग बापूराव पोटे, पोलीस उपअधीक्षक, १४. दयानंद सदाशिव गावडे, पोलीस उपअधीक्षक, १५. पुष्पलता राजाराम दिघे, पोलीस उपअधीक्षक, १६. सुनील शंकर शिंदे, निरीक्षक, १७. सुवर्णा उमेश शिंदे, निरीक्षक, १८. अनंत ज्ञानेश्वर माळी, पोलीस उपअधीक्षक, १९. महेंद्र दत्तात्रय कोरे, निरीक्षक/आरओ/आरएम, २०. कैलास रामजी बाराभाई, निरीक्षक/आरओ/आरएम, २१. विनय गोपाळ मोहिते, उपनिरीक्षक, २२. भारत रावसाहेब सावंत, इन्स्पेक्टर/एआरएमआर, २३. नरेंद्र सखाराम राऊत, सहायक उपनिरीक्षक, २४. सतीश जनार्दन निंबाळकर, उपनिरीक्षक, २५. अफजल खान शेहजादे खान पठाण, सहायक उपनिरीक्षक, २६. प्रदीप साहेबराव सावंत, सहायक उपनिरीक्षक, २७. सुभाष वामन साळवी, उपनिरीक्षक, २८. प्रमोद रोहिदास वाघमारे, निरीक्षक (पीए), २९. विजयकुमार शंकर शिंदे, उपनिरीक्षक, ३०. विक्रम व्यंकटराव नवरखेडे, उपनिरीक्षक, ३१. विजय प्रभाकर देवरे, उपनिरीक्षक, ३२. मनोज यशवंत गुजर, उपनिरीक्षक, ३३. अजय मनोहर सावंत, उपनिरीक्षक, ३४. गंगाधर रामचंद्र घुमरे, उपनिरीक्षक, ३५. संजय एकनाथ शेलार, उपनिरीक्षक, ३६. महादेव मधुकर खंडारे, निरीक्षक/एआरएमआर, ३७. राजकुमार चनवीरप्पा टोळनुरे, उपनिरीक्षक, ३८. बाबासाहेब नाथा ढाकणे, उपनिरीक्षक, ३९. शिवदास दत्तात्रय फुटाणे, उपनिरीक्षक, ४०. सुरेश साहेबराव सोनवणे, उपनिरीक्षक

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra: 89 Police, Staff Honored with Gallantry, Service Medals

Web Summary : Republic Day honors 89 Maharashtra officers/staff with gallantry, service medals. Awards recognize police, fire, home guard, and correctional services personnel for exceptional contributions.
टॅग्स :पोलिसमहाराष्ट्र