boy dead after dawn in waterfall in thane | ठाण्यातील धबधब्यामध्ये पाेहण्यास आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
ठाण्यातील धबधब्यामध्ये पाेहण्यास आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

ठाणे : येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील भारतीय वायुदलामादील धबधब्यामध्ये पाेहण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. अजय खरटमाेल( वय 19) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

अजय हा त्याच्या चार मित्र अक्षक कटके, मनिष चंद्रमाेरे, जय सराेदे, रिषभ सराेदे यांच्यासाेबत वर्षाविहारासाठी लाेकमान्य नगर पाडा नं 3 येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील धबधब्यामध्ये पाेहण्यास आला हाेता. पाेहताना अजय खरटमाेल पाण्यात बुडाला. याबाबतची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान तसेच ठाणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अजयला पाण्यातून बाहेर काढले असता त्याचा मृत्यू झाला हाेता. पुढील तपास वर्तकनगर पाेलीस करीत आहेत. 


Web Title: boy dead after dawn in waterfall in thane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.