धनुष्यबाण ते हवाबाण, पुरावे द्या आणि मोकळे व्हा - अतुल भातखळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:07 AM2020-12-30T04:07:38+5:302020-12-30T04:07:38+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण. नेहमीप्रमाणे तोेंडाची वाफ ...

From bow to air, give proof and be free - Atul Bhatkhalkar | धनुष्यबाण ते हवाबाण, पुरावे द्या आणि मोकळे व्हा - अतुल भातखळकर

धनुष्यबाण ते हवाबाण, पुरावे द्या आणि मोकळे व्हा - अतुल भातखळकर

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण. नेहमीप्रमाणे तोेंडाची वाफ आणि नुसत्या हवेतल्या पोकळ गप्पा करण्यापेक्षा त्यांनी पुरावे द्यावेत आणि मोकळे व्हावे. कर नाही त्याला डर कशाला, अशा शब्दात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या आरोपांचा समाचार घेतला.

संजय राऊत आपल्या सवंग राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन मांडले आहे. चांगले आहे यानिमित्ताने लोकांना शिवसेनेची औकात कळते आहे, असा टोमणा मारतानाच राऊतांनी वैफल्यग्रस्ततेने आज अनेक सवंग विधाने केल्याचे भातखळकर म्हणाले. मी तोंड उघडले तर केंद्र सरकारला हादरे बसतील, म्हणणाऱ्या राऊतांचे तोंड दाबलंय कुणी? जे मनात येईल ते बोला. तुमच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही. त्यामुळे संजय राऊत कर नाही त्याल डर असायचे कारण नाही. थेट पुरावे द्या, ईडीच्या नोटिशीला उत्तर द्या. भाजपवर हेतूवार आरोप करण्याचे धंदे व उद्योग बंद करा. कंपाउंडरकडून औषध घेताय आता एमडी डॉक्टरकडून घ्या, म्हणजे तुमची मनस्थिती थोडी ठीक होईल असेही भातखळकर म्हणाले.

....................

Web Title: From bow to air, give proof and be free - Atul Bhatkhalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.