Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:24 IST2025-06-17T16:23:17+5:302025-06-17T16:24:58+5:30

Mumbai School Bomb Threat: गोवंडी आणि कांदिवली येथील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोटाने उडविण्याचे ई-मेल आले.

Bomb threat to two international schools in Mumbai | Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...

Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...

मुंबई: शहरामध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्याचे सत्र सुरूच असून, अमेरिकन वकिलातीपाठोपाठ आता गोवंडी आणि कांदिवली येथील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोटाने उडविण्याचे ई-मेल आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हे नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर कॉम्प्लेक्स येथील रायन आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बस्फोट घडविण्याचा ई-मेल शनिवारी आला होता. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. परंतु, या धमकीमध्ये तथ्य नसल्याचे आढळले. आरोपीने धमकी देण्यासाठी दिवीज प्रभाकर लक्ष्मी नावाचा ई-मेल आयडी तयार केला होता. तो ई-मेल आयडी वापरणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणामागे खोडसाळपणा असल्याचा पोलिसांना संशय आहे.
 
कांदिवलीपाठोपाठ गोवंडीच्या कनकिया आंतरराष्ट्रीय शाळेलाही बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली आहे. याही शाळेला दिवीज प्रभाकर लक्ष्मी नावाने मेल आला हे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांमध्ये एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय आहे. याप्रकरणी रविवारी देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखेचाही समांतर तपास 
सार्वजनिक शांतता भंग करून भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी खोटी धमकी दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 
गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांची गुन्हे शाखाही याप्रकरणी समांतर तपास करीत आहे.

अमेरिकन वाणिज्य वकिलातीलाही फोन 
बीकेसीतील अमेरिकन वाणिज्य वकिलातीलाही शनिवारी रात्री बॉम्बस्फोट घडविण्याच्या धमकीचा दूरध्वनी आला होता. याप्रकरणीही तपास सुरू आहे. पडताळणीत त्यातही काहीही संशयास्पद आढळून आले नाही, असे बीकेसी पोलिसांनी स्पष्ट केले.

Web Title: Bomb threat to two international schools in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.