Join us

मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बॉम्ब स्कॉड दाखल, शोधमोहिम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 23:48 IST

सध्या मेन लाईन वेटिंग हॉल पूर्णपणे खाली करण्यात आला आहे. तसेच, स्थानकातील सर्व स्वच्छतागृह, खानपान स्टॉप यापासून तिकीट घर आदींची कसून तपासणी सुरू आहे.

ठळक मुद्देसध्या मेन लाईन वेटिंग हॉल पूर्णपणे खाली करण्यात आला आहे. तसेच, स्थानकातील सर्व स्वच्छतागृह, खानपान स्टॉप यापासून तिकीट घर आदींची कसून तपासणी सुरू आहे.

मुंबई - राजधानी मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याची धक्कादायक माहिती एका निनावे फोनद्वारे रेल्वे विभागाला मिळाली आहे. त्यानंतर, तात्काळ रेल्वे स्थानकावर बॉम्ब स्कॉड पथक दाखल झाले असून शोध मोहिम सुरू असल्याची माहिती रेल्वेतील अधिकाऱ्याने दिली. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली आहे. 

सध्या मेन लाईन वेटिंग हॉल पूर्णपणे खाली करण्यात आला आहे. तसेच, स्थानकातील सर्व स्वच्छतागृह, खानपान स्टॉल, यांपासून तिकीट घर आदींची कसून तपासणी सुरू आहे. अजूनही शोध सुरूच असून रेल्वे गाड्या वेळेवर सोडण्यात येत आहेत. 

टॅग्स :मुंबईरेल्वेस्फोटके