bollywood was safe because of balasaheb thackeray says Urmila Matondkar | बाळासाहेब होते म्हणून बॉलिवूड सुरक्षित होतं: उर्मिला मातोंडकर

बाळासाहेब होते म्हणून बॉलिवूड सुरक्षित होतं: उर्मिला मातोंडकर

दिवंगत शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरील आयोजित रक्तदान शिबिराला शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी हजेरी लावली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळालाही मातोंडकर यांनी वंदन केलं.  

"आज मी शिवसेनेचा भाग आहे म्हणून इथं आले असले तरी बाळासाहेबांबाबत माझ्या मनात नेहमीच आदर राहीला आहे. बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम करू शकलो. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे. त्यामुळे त्यांचे विचार आणि स्वत: बाळासाहेब अजूनची आमच्यासोबतच आहेत", असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. 

उद्धव ठाकरे हे वाचाळांमध्ये कृतीतून बोलणारे व्यक्ती
"सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या माणसाचा कृतीवर विश्वास असतो त्याची कृती आणि महाराष्ट्रासाठीची प्रगती बोलते. त्यामुळे त्यांनी कमीत कमी बोललं तरी ते लोकांपर्यंत पोहोचतं", असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. "कोविड काळात ज्यापद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी संयम दाखवला तो कौतुकास्पद होता. असे नेते एकंदर देशातच खूप कमी आहेत आणि त्यातले सर्वात महत्वाचे नेते हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आपला धर्म म्हणजे फक्त मंदिर नाही आणि सत्ता हे म्हणजे शेवटचं गणित नाही. माणसांचं आयुष्य महत्वाचं आहे हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे निर्णय घेतले ते मला महत्वाचे वाटतात", असंही त्या पुढे म्हणाल्या.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bollywood was safe because of balasaheb thackeray says Urmila Matondkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.