खळबळ! हाजी अली पोलीस चौकीमागे समुद्रकिनारी आढळला एका महिलेचा मृतदेह
By पूनम अपराज | Updated: October 5, 2020 20:47 IST2020-10-05T20:47:09+5:302020-10-05T20:47:52+5:30
Dead Body : महिलेचा मृतदेह नायर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.

खळबळ! हाजी अली पोलीस चौकीमागे समुद्रकिनारी आढळला एका महिलेचा मृतदेह
घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज परिसरातून एक महिला गटारातून वाहून गेल्याची घटना घडली होती. आज पहाटे ३ वाजता या महिलेचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्रकिनारी आढळला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपासातही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेचा मृतदेह नायर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या असल्फा भागातून पर्जन्य जलवाहिनीतून शीतल जितेश दामा ही 32 वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना घडली होती. आज पहाटेच्या सुमारास शीतलचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्र किनारी आढळला. असल्फा ते हाजीअली दरम्यान जवळपास 20 ते 22 किमीचं अंतर आहे. ऐवढ्या लांब नाल्यातून मृतदेह कसा वाहून गेला असा प्रश्न उपस्थित होत आहे. तब्बल 20 ते 22 किमीचा प्रवास करून हाजीअलीच्या समुद्र किनारी महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणी आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासून काही धागेदोरे मिळतात का याचा तपास करत आहेत.
खळबळजनक! राजेश टोपे यांच्या बैठकीदरम्यान शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न