The body of a woman suffering from corona was kept for 9 hours by a private hospital for bills | बीलासाठी खाजगी रुग्णालयाने 9 तास रोखला कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह

बीलासाठी खाजगी रुग्णालयाने 9 तास रोखला कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह

ठळक मुद्देसामान्य कुटुंबातील रुग्ण महिलेची मुलगी 10 - 12 हजार पगाराची नोकरी करते. रुग्णालयाने पैसे मागितले तसे स्वतः जवळचे होते तेवढे भरले . सकाळी 8 च्या सुमारास रुग्णालयाने मृतदेह हवा असेल तर आधी 2 लाख 26 हजार भरा असे सांगितले.

मीरारोड - भाईंदरच्या एका खाजगी रुग्णालयाने बिलाचे पैसे दिले नाही म्हणून कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह तब्बल 9 तास अडवून ठेवला. महिलेच्या, मुलीने आईचे दागिने गहाण ठेऊन व उसने पैसे घेऊन रुग्णालय आणि औषधांचे सुमारे पावणे पाच लाख रुपये भरले पण रुग्णालयाने आणखी 2 लाख 26 हजारांचे बिल भरा सांगत मृतदेह अडवून ठेवला होता . आमदार प्रताप सरनाईकयांच्या हस्तक्षेपा नंतर रुग्णालयाने मृतदेह दिला. उत्तनच्या भूतोडी बंदर येथील राहणाऱ्या 59 वर्षीय महिलेस भाईंदर पूर्वेच्या फेमिली केअर रुग्णालयात श्वसनाचा त्रास होत असल्याने मुलगी व मुलाने 26 जून रोजी उपचारासाठी दाखल केले होते. सामान्य कुटुंबातील रुग्ण महिलेची मुलगी 10 - 12 हजार पगाराची नोकरी करते. रुग्णालयाने पैसे मागितले तसे स्वतः जवळचे होते तेवढे भरले . 

नंतर आईचे दागिने गहाण ठेऊन पैसे आणून रुग्णालयात भरले. नातलग व परिचितां कडून मिळतील तेवढे उसने व मदत म्हणून पैसे जमवले ते देखील रुग्णालय व औषधा साठी खर्च झाले. रुग्णालयास 2 लाख 60 हजार तर तेथील मेडिकल व औषधांसाठी सुमारे सव्वादोन ते अडीच लाख खर्च झाले असे मुलगी म्हणाली. पैसे भरले नाही तर मेडिकल मधून औषधे दिली जात नसे. शनिवारी देखील उपचार होत नसल्याने स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी गेल्या होत्या. आज रविवारी सकाळी 7 च्या सुमारास रुग्णालयाने तुमचा रुग्ण अंतिम श्वासावर असल्याचे कळवल्याने मुलगी , मुलगा व अन्य नातलग रुग्णालयात दाखल झाले. 

सकाळी 8 च्या सुमारास रुग्णालयाने मृतदेह हवा असेल तर आधी 2 लाख 26 हजार भरा असे सांगितले. इतके बिल झाले कसे आणि आधीच कर्जबाजारी झाल्याने आम्ही पैसे भरायचे कुठून असा सवाल कुटुंबीयांनी केला . परंतु पैसे भरा नाहीतर मृतदेह मिळणार नाही असे रुग्णालयाने सांगितले. मुलगी आणि मुलगा आपल्या आईचा मृतदेह मिळावा या साठी रुग्णालयाच्या आवारात बसून असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांना कळताच त्यांनी व्यवस्थापनाच्या शालिनी अय्यर याना कॉल केला . पालिका आरक्षणातील  सदर रुग्णालय इमारत भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांची असून ती फेमिली केअरला भाड्याने दिली आहे .  त्यामुळे या रुग्णालयाच्या अवास्तव बिल बाबत वाढत्या तक्रारी असून नरेंद्र मेहतांना भाडे द्यायचे म्हणून रुग्णांची लूट करता का ? असा सवाल करत अश्या बिकट स्थितीत लुटायचे धंदे बंद करा असे सरनाईकानी खडसावले.  

मग रुग्णालयाने मृतदेह देण्यासाठी आधी दिड लाख व नंतर 50 हजार तरी भरा असे नातलगांना सांगितले . पण आपल्या कडे केवळ 10 हजार रुपयेच शिल्लक असल्याचे नातलगांनी स्पष्ट केले . नवघर पोलिसांना सरनाईकानी तक्रार केल्यावर सहाय्यक निरीक्षक देवरे व काळे रुग्णालयात दाखल झाले . सुरुवातीला आमचे व्यवस्थापक येतील असा वेळकाढूपणा रुग्णालयाने केला. परंतु तक्रार करून कारवाई करायला लावू असे सरनाईकानी खडसावल्यावर ४ च्या सुमारास मृतदेह देण्यास रुग्णालय तयार झाले. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The body of a woman suffering from corona was kept for 9 hours by a private hospital for bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.