Mumbai Doctor Found Dead: मुंबईत एका महिला डॉक्टरचा रुग्णालय परिसरात असलेल्या क्वार्टरमध्येच मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली. मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयात महिला डॉक्टर कार्यरत होती. खोलीमध्ये फरशीवर त्यांचा मृतदेह पडलेला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
डॉ. अनुजा कुलकर्णी असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्या कान-नाक-घसा तज्ज्ञ होत्या. पश्चिम रेल्वे विभागाच्या जगजीवन राम रुग्णालयात त्या कार्यरत होत्या. डॉ. अनुजा कुलकर्णी या अविवाहित होत्या आणि रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील क्वार्टरमध्ये राहत होत्या.
ऑपरेशनसाठी आल्याच नाही
डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्या काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया निश्चित झालेल्या होत्या. शस्त्रक्रियेच्या वेळा बुधवारी निश्चित केलेल्या असताना, त्या ठरलेल्या वेळेत ऑपरेशन थिएटरमध्ये आल्याच नाही. त्यामुळे त्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
अनुजा कुलकर्णी यांच्याकडून कॉलला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णालयातील त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी चौथ्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या खोलीकडे धाव घेतली. त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला.
फरशीवर पडलेला होता मृतदेह
खोलीमध्ये अनुजा कुलकर्णी यांचा फरशीवर संशयास्पद अवस्थेत मृतदेह पडलेला होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवला.
अनुजा कुलकर्णी यांच्यासोबत मृत्यूपूर्वी काही घडले होते का? त्यांचा मृत्यू कसा झाला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यासाठी सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली जात आहे.
Web Summary : A doctor was found dead in her Mumbai hospital quarter, sparking a police investigation. Dr. Anuja Kulkarni, an ENT specialist, was discovered unresponsive after missing scheduled surgeries. The cause of death is currently under investigation, with police reviewing CCTV footage.
Web Summary : मुंबई में एक महिला डॉक्टर अपने अस्पताल के क्वार्टर में मृत पाई गईं, जिससे पुलिस जांच शुरू हो गई है। डॉ. अनुजा कुलकर्णी, ईएनटी विशेषज्ञ, निर्धारित सर्जरी में अनुपस्थित रहने के बाद बेसुध पाई गईं। मौत का कारण जांच के अधीन है, पुलिस सीसीटीवी फुटेज की समीक्षा कर रही है।