Join us
Daily Top 2Weekly Top 5

सांताक्रूझमध्ये नाल्यात पडलेल्या मुलीचा मृतदेह ३ दिवसांनी वांद्रे नाल्यात आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 19:03 IST

श्रेया मिलिंद काकडे (७) असे या मृत मुलीचे नाव असून, पोलीसमार्फत तिचा मृतदेह सायन रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मुंबई : सांताक्रूझ येथील नाल्यात घर पडून झालेल्या दुर्घटनेतील चौथ्या बेपत्ता मुलीचा मृतदेह तब्बल ३ दिवसांनी वांद्रे, भारत नगर येथील नाल्यात आढळला आहे. श्रेया मिलिंद काकडे (७) असे या मृत मुलीचे नाव असून, पोलीसमार्फत तिचा मृतदेह सायन रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

४ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता सांताक्रूझ येथे धोबी घाट रोड परिसरातील नाल्याला लागून असलेले घर नाल्यात कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत घरात असलेल्या ३ मुली आणि १ महिला या चौघी नाल्यात पडल्या होत्या. चौघींपैकी जान्व्ही मिलिंद काकडे (दिड वर्षे), रेखा काकडे (२६) यांचा मृत्यू झाला होता. तर शिवन्या मिलिंद काकडे या तीन वर्षांच्या मुलीस स्थानिकांनी सुरक्षित बाहेर काढून व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल केले होते. ७ ऑगस्ट  रोजी उपचार करून तिला सोडून देण्यात आले. तर श्रेया मिलिंद काकडे (७) या मुलीचे शोधकार्य सुरु होते. ७ ऑगस्ट  रोजी अग्निशमन दलामार्फत भारत नगर पोलीस चौकी, बीकेसी, वांद्रे पूर्व येथील नाल्यातून तिला मृत अवस्थेत बाहेर काढून पोलीसमार्फत सायन रुग्णालयात पाठविण्यात आले, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.  

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊस