Join us

कार्टर रोडजवळील समुद्र किनाऱ्यावर सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 19:32 IST

३० ते ३५ वयोगटातील हि अज्ञात व्यक्ती असल्याची पोलिसांची शक्यता

मुंबई - आज सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह खार पोलिसांना कार्टर रोडनजीक नौशाद  इमारतीसमोर समुद्र किनाऱ्यावर खारफुटीच्या झुडपात आढळून आली. या मृतदेहावर अनेक जखमा असून विशेषतः गळ्यावर टोकदार वस्तूने मारल्याच्या खुणा पोलिसांना दिसून आल्या आहेत. त्यामुळे हि हत्या आहे कि समुद्राच्या पाण्यातून वाहत आलेला मृतदेह आहे का? याबाबत खार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मयत अज्ञात मृतदेह हा ३० ते ३५ वयोगटातील इसमाचा असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक अंदाजानुसार खार पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा खून असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :मुंबईगुन्हापोलिस