पालिकेचे एक लाख प्रवेशाचे लक्ष्य, शिक्षण विभागाची मिशन ॲडमिशन मोहीम; विद्यार्थ्यांची गळती रोखण्यावर विशेष भर

By सीमा महांगडे | Updated: June 9, 2025 13:44 IST2025-06-09T13:43:44+5:302025-06-09T13:44:06+5:30

Mumbai School News: मुंबई पब्लिक स्कूलमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात एक लाख नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट महापालिकेच्या शिक्षण विभागाने ठेवले आहे. त्याकरिता ‘मिशन ॲडमिशन- एकच लक्ष्य, एक लक्ष’ मोहीम राबवण्यात येत आहे. 

BMC's target of one lakh admissions, Education Department's Mission Admissions campaign; Special emphasis on preventing student dropout | पालिकेचे एक लाख प्रवेशाचे लक्ष्य, शिक्षण विभागाची मिशन ॲडमिशन मोहीम; विद्यार्थ्यांची गळती रोखण्यावर विशेष भर

पालिकेचे एक लाख प्रवेशाचे लक्ष्य, शिक्षण विभागाची मिशन ॲडमिशन मोहीम; विद्यार्थ्यांची गळती रोखण्यावर विशेष भर

सीमा महांगडे 
मुंबई - मुंबई पब्लिक स्कूलमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात एक लाख नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट महापालिकेच्या शिक्षण विभागाने ठेवले आहे. त्याकरिता ‘मिशन ॲडमिशन- एकच लक्ष्य, एक लक्ष’ मोहीम राबवण्यात येत आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून ही मोहीम राबविण्यात येत असून, त्यामुळे पालिका शाळांच्या पटसंख्येत सातत्य टिकवण्यात मदत होत आहे. सध्या पालिका शाळांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक, असे एकूण दोन लाख ९८ हजार ७३१ विद्यार्थी आहेत. 

‘मिशन ॲडमिशन’साठी शिक्षण विभागाने शाळा, मुख्याध्यापक, शिक्षकांना सूचना दिल्या आहेत. सर्व शाळांमधील तसेच पूर्व प्राथमिक शेवटच्या इयत्तांचे शाळा सोडल्याचे दाखले जवळच्या शाळांमध्ये निकालानंतर हस्तांतरित करणे आवश्यक आहे. बालवाडी ते माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत, कोणत्याही विद्यार्थ्यांची मुंबई पब्लिक स्कूलमधून गळती होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.

नवीन प्रवेशांसाठी दाट लोकवस्तीच्या ठिकाणी स्टॉल लावणे, पथनाट्य सादर करणे, असे कार्यक्रमही घेतले जाणार आहेत. शिवाय प्रवेशाचा ऑनलाइन गुगल फॉर्म देणे, गृहभेटी देणे, शालेय व्यवस्थापन व पालक सभा घेऊन प्रवेशासाठी पालकांना प्रोत्साहित करण्याचे उपक्रमही शाळा प्रशासनास घेता येणार आहेत. 

Web Title: BMC's target of one lakh admissions, Education Department's Mission Admissions campaign; Special emphasis on preventing student dropout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.