Join us  

मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय, भाजपा पराभूत 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 11:25 AM

मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला आहे.

ठळक मुद्दे मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला आहे. शिवसेनेत प्रवेश केलेले विठ्ठल लोकरे विजयी झाले आहेत.लोकरे यांनी भाजपाचे बबलू पांचाळ यांचा पराभव केला आहे.

मुंबई - मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला आहे. महापालिका प्रभाग क्रमांक 141 पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले विठ्ठल लोकरे विजयी झाले आहेत. लोकरे यांनी भाजपाचे बबलू पांचाळ यांचा पराभव केला आहे. यामुळे शिवसेनेच्या संख्याबळात एकने वाढ होऊन 96 झाली आहे. 2017 मध्ये लोकरे या विभागात काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेना पक्षातून लढवली. फतिथे त्यांचा पराभव झाला. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पोटनिवणुकीत पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती.

मानखुर्द येथील प्रभाग क्रमांक 141 मधील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. राज्यात महाविकासआघाडी असूनही या प्रभागात शिवसेना, भाजपा, काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांसह सुमारे 18 उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेची ही जागा खेचून आणण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. चुरशीच्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. वॉर्ड क्रमांक 141 मध्ये विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. 

शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपाचे बबलू पांचाळ, काँग्रेसचे काजी अल्ताफ महंमद, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमाम ऊद्दिन आणि समाजवादीचे खान जमिर भोले या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होती. हा प्रभाग शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असून, लोकरे त्यांच्या मर्जीतील उमेदवार आहेत. ख़ासदार मनोज कोटक यांचाही लोकसभा मतदारसंघ याच परिसरातून जातो. कोटक हे पालिकेतील भाजपाचे गटनेते असल्याने सेनेकडून ही जागा खेचण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.  

महत्त्वाच्या बातम्या 

जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट बंदीवरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला खडे बोल

शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात थेट जमा होणार 15 हजार; आंध्र प्रदेश सरकारची नवी योजना

बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली; जिल्हा परिषद निवडणूक निकालावरुन शिवसेनेचे भाजपावर बाण

गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीला मोठं यश; मुख्य आरोपी ऋषिकेशला अटक

हिंसाचार थांबला की मगच ‘सीएए’वर सुनावणी घेऊ; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

 

टॅग्स :शिवसेनाभाजपामुंबईनिवडणूक