Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 20:54 IST

उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची संयुक्त सभा शिवाजी पार्कवर सुरु आहे.

BMC Elections 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची सभा होत आहे. या सभेमध्ये पहिले भाषण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले. देशपांडे यांनी सभेच्या सुरुवातीलाच विरोधकांवर निशाणा साधला. मला तर कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं कधी होईल. ठाकरे बंधूंची सभा असताना मला भाषण करायला मिळेल हे स्वप्नातही नव्हतं.  मी भाषण करतोय हे माझं भाग्य समजतो. अनेक दिवसांपासून लोकं म्हणतात ठाकरे ब्रँड संपला, मला हे सांगायचं आहे, ठाकरे हा ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार कधी संपत नसतो', असंही देशपांडे म्हणाले.

संदीप देशपांडे म्हणाले, तुमचा गुजरातचा आहे तो ब्रँड आहे, आमचा विचार आहे. कोलगेट वापरुन झाल्यानंतर लोक पेप्सोडेंट वापरतात. 10 वर्ष तुम्हाला वापरुन कंटाळा आलाय, तुम्हाला लोक चेंज करणार आहेत. हा बदल करण्यासाठी आमचा विचार उपयोगी ठरणार आहे, असा टोलाही देशपांडे यांनी लगावला.

आमच्या रणरागिनी येथे बसल्या आहेत. त्यांना आमिष दाखवली जातात. आमच्या बहिणी होत्या, त्या लाडक्या बहिणी झाल्या आहेत.१५०० रुपयांचे आमिष दाखवायचं, तुम्ही आम्हाला मतदान करा. आता १३ लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकणार आहेत, असे बोलले जात आहे. निवडणुकीची आचारसंहिता आमच्यासाठी असते, त्यांच्यासाठी नाही, अशी टीकाही देशपांडे यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray is an idea, not a brand, says Sandeep Deshpande.

Web Summary : Ahead of BMC elections 2026, MNS leader Sandeep Deshpande stated that Thackeray is an ideology, not a brand. He criticized opponents, alleging inducement of voters with money, and accused them of violating election conduct rules.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२६मनसेशिवसेनासंदीप देशपांडे