BMC Election Results 2026: माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांना पराभवाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 08:41 IST2026-01-17T08:41:12+5:302026-01-17T08:41:19+5:30

सुमारे अडीच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला.

BMC Election Results 2026 Former Leader of the Opposition Ravi Raja suffers a shocking defeat | BMC Election Results 2026: माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांना पराभवाचा धक्का

BMC Election Results 2026: माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांना पराभवाचा धक्का

मुंबई : महापालिकेत पाच वेळा निवडून आलेले, ज्येष्ठ नगरसेवक अशी ओळख असलेले आणि निवडणुकीपूर्वी काही महिने आधी भाजपमध्ये प्रवेश केलेले रवी राजा यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे. सायन कोळीवाडा येथील त्यांचा प्रभाग आरक्षित झाल्यामुळे भाजपने त्यांना धारावीतील प्रभाग क्रमांक १८५ मधून उमेदवारी दिली होती. प्रभागातील बदल त्यांच्या पराभवाचे एक प्रमुख कारण मानले जाते. सुमारे अडीच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला.

युवक काँग्रेसमधून राजकीय वाटचाल सुरू करणाऱ्या रवी राजा यांनी काँग्रेसचे गटनेते तसेच विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडली. बेस्ट समितीवर त्यांनी २२ वर्षे सदस्य म्हणून काम पहिले होते. संघटन कौशल्य, अनुभव आणि जनसंपर्काच्या बळावर ते पालिकेच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावत होते. दीर्घकाळ पक्षाची सेवा करूनही अपेक्षित संधी न मिळाल्याचा आरोप करत २०२४ मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांची पक्षाच्या मुंबई उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. २०१७ साली ते निसटत्या मतांनी विजयी झाले होते. यंदा उद्धवसेनेचे टी. एम जगदीश यांनी त्यांचा अडीच हजार मतांनी पराभव केला. जगदीश यांना ८,८४७, तर रवी राजा यांना ६,३८४ मते मिळाली.

नकारात्मक प्रचार भोवला

धारावी पुनर्विकासात आपल्याला बाहेर फेकले जाईल असा अपप्रचार विरोधकांनी केला होता. या प्रचाराचा विपरित परिणाम झाल्याने पराभव झाला, अशी प्रतिक्रिया रवी राजा यांनी दिली. वॉर्ड बदलाचा फटका बसला का, असे त्यांना विचारले असता, पक्षाने मला उमेदवारी दिली, त्या ठिकाणी मी लढत दिली, मी पक्षाचा आदेश मानला, असे ते म्हणाले.
 

Web Title : बीएमसी चुनाव 2026: पूर्व विपक्ष नेता रवि राजा को मिली हार

Web Summary : पांच बार के पार्षद रवि राजा, जो हाल ही में भाजपा में शामिल हुए, धारावी से बीएमसी चुनाव हार गए। वार्ड बदलने और नकारात्मक अभियानों ने शिवसेना के टी.एम. जगदीश के खिलाफ उनकी हार में योगदान दिया। राजा ने धारावी पुनर्विकास के बारे में गलत सूचना को एक प्रमुख कारक बताया।

Web Title : Ex-Opposition Leader Ravi Raja Suffers Shock Defeat in BMC Election

Web Summary : Five-time corporator Ravi Raja, who recently joined BJP, lost the BMC election from Dharavi. Shifting wards and negative campaigns contributed to his defeat against Shiv Sena's T.M. Jagdish. Raja cited misinformation about Dharavi redevelopment as a key factor.