राज्यातील २९ महानगर पालिकांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. आज मतमोजणी होत आहे. राज्यात बहुतांश महापालिकेत भाजपा उमेदवार आघाडीवर दिसत आहेत. यातच राज्यासह संपूर्ण देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेचा पहिला निकाल आता समोर आला आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत. त्या १० हजारहून अधिक मतांनी जिंकल्या आहेत.
तेजस्वी घोसाळकर या पूर्वी शिव सेनिक होत्या. अखंड शिवसेना असताना त्या आणि त्यांचे पती शिव सैनिक म्हणून ओळखले जत. मात्र अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर, तेजस्वी घोसाळकर यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला होता. त्यांना भाजपने तिकीट दिले आणि त्या निवडून आल्या आहेत.
मुंबई महानगरपालिका निकालाचे सर्व अपडेट्स इथे पहा Live विजयासंदर्भात काय म्हणाल्या घोसाळकर? -"विजयाचा अत्यंत आनंद होत आहे. हा भाजपचा बालेकिल्ला होता. तो असाच राहील आणि आता भविष्यातही विरोधात कुणी उभे राहतांना विचार करून उभे राहतील. तसेच, आम्ही कुणावरही टीका केली नाही. केवळ विकासाच्याच मुद्द्यावर बोलत होतो. त्यामुळे आम्हाला विकास कामांच्या आधारावरच मते मिळाली आहेत, असे घोसाळकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, या विजयाचे श्रेय भारतीय जनता पक्षाचे असल्याचेही त्या म्हणाल्या.
12.15 वाजेपर्यंतचे मुंबई महापालिकेचे निकाल -
Web Summary : BJP's Tejasvi Ghosalkar won Mumbai's Ward 2 by over 10,000 votes. Formerly a Shiv Sena member, she recently joined BJP after her husband's murder. Ghosalkar credits BJP for the victory, emphasizing development-focused campaigning.
Web Summary : बीजेपी की तेजस्वी घोसालकर ने मुंबई के वार्ड 2 में 10,000 से अधिक वोटों से जीत हासिल की। पहले शिवसेना सदस्य, वह हाल ही में अपने पति की हत्या के बाद बीजेपी में शामिल हुईं। घोसालकर ने विकास-केंद्रित प्रचार पर जोर देते हुए बीजेपी को जीत का श्रेय दिया।