Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC Election Results 2026: आक्रमक विरोधी पक्षामुळे सत्ताधारी-प्रशासनावर अंकुश; स्थानिक राजकारण बदलण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 08:28 IST

पालिकेतील विकासकामे करताना सर्व पक्षांना विश्वासात घेणे भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार

मुंबई : इतिहासात प्रथमच मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकण्याचे स्पष्ट संकेत निकालांवरून मिळत आहेत. शिंदेसेना आणि गरज भासल्यास राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पाठबळावर भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता बळावली आहे. याउलट आतापर्यंत सत्तेचा अनुभव घेतलेल्या काँग्रेस आणि उद्धवसेनेला विरोधी बाकांवर बसावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या सोबतीला मनसे, समाजवादी पक्ष आणि एमआयएमही असल्याने भाजपसमोर एक आक्रमक आणि संख्याबळ असलेला विरोधी पक्ष उभा राहणार आहे. त्यामुळे पालिकेतील विकासकामे करताना सर्व पक्षांना विश्वासात घेणे भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि तत्कालीन एकसंध शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी शिवसेनेला ८४, तर भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. संख्याबळ जवळपास समान असूनही भाजपने सत्तेत सहभागी न होता विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली होती. 'चौकीदार' म्हणून ओळखली गेलेली ही भूमिका भाजपने पाच वर्षे निभावली होती.

प्रशासक राज संपुष्टात येऊन आता लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होणार आहे. त्यातून विकासाची कामे अधिक गतीने होतील, अशी अपेक्षा आहे.

राजकारण अधिक गतिमान 

गेली सुमारे चार वर्षे महापालिकेत लोकप्रतिनिधीच नसल्याने संपूर्ण कारभार प्रशासकीय यंत्रणेच्या हाती होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रणाचा अभाव जाणवत होता. आता नव्या सत्तासंरचनेमुळे पुन्हा राजकीय अंकुश प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंसह अन्य विरोधी पक्षही अधिक सक्रिय राहतील, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेतील राजकारण अधिक गतिमान आणि संघर्षपूर्ण होण्याची चिन्हे आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP poised to win BMC elections, reshaping Mumbai's local politics.

Web Summary : BJP likely to win BMC elections with support from Shinde Sena. Congress and Uddhav Sena may face opposition. Expect faster development with political control over administration as representative governance resumes.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६भाजपाउद्धव ठाकरे