Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन लोटस' की 'मातोश्री'ची खेळी? शिंदे मुंबईतील जिंकलेल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:02 IST

Eknath Shinde BMC Fear: मुंबईत सत्तास्थापनेसाठी ११४ जागा लागणार आहेत. भाजपाला स्पष्ट बहुमत काही केल्या मिळालेले नाही. यामुळे त्यांना शिंदेंची मदत घ्यावी लागणार आहे.

मुंबई महापालिकेमध्ये भाजपा आणि शिंदे शिवसेनेने एकहाती सत्ता आणली आहे. भाजपाचे 89, शिंदेसेनेचे 29 उमेदवार निवडून आले आहेत. सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या बहुमताच्या थोडे जास्त जागा जिंकल्या आहेत. असे असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठी भिती सतावत आहे. यामुळे ते आपले निवडून आलेल्या उमेदवारांना दगाफटका होऊ नये म्हणून हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. 

मुंबईत सत्तास्थापनेसाठी ११४ जागा लागणार आहेत. भाजपाला स्पष्ट बहुमत काही केल्या मिळालेले नाही. यामुळे त्यांना शिंदेंची मदत घ्यावी लागणार आहे. अशातच ठाकरे बंधू आणि काँग्रेस जर एकत्र आली तर मात्र महायुतीच्या सत्ताथापनेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. ठाकरे शिवसेना ६५, मनसे ६ आणि शप राष्ट्रवादी १ असे आघाडीच्या जागा आलेल्या आहेत. या जागा ७२ एवढ्या होत आहेत. तर एकट्या काँग्रेसच्या २४ जागा आलेल्या आहेत. हा आकडा ९६ च्या घरात जात आहे. याचबरोबर काँग्रेसच्या विचारांचे इतर पक्ष असे नगरसेवक मिळाले तर बहुमताच्या जवळपास हा आकडा जात आहे. 

ठाकरे गटासह मविआने जर सत्तास्थापनेचा प्रयत्न केला तर त्यांना शिंदे गटालाच फोडणे सोईचे ठरणार आहे. कारण शिंदेंचे निवडून आलेले नगरसेवक हे पूर्वाश्रमीचे ठाकरेंचेच पदाधिकारी होते, यामुळे या लोकांना समजाविणे ठाकरेंना सोपे जाईल आणि त्याचा फटका महायुतीला बसेल अशी भिती शिंदेंना वाटत आहे. 

दुसरे एक कारण म्हणजे मुंबईवर युतीची सत्ता असली तरी आतापर्यंत शिवसेनेचाच महापौर होता. आता भाजपाच्या जागा जास्त आहेत, यामुळे भाजपा महापौर करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. परंतू, त्यातही तोडपाणी करता आले आणि २.५-२.५ वर्षे महापौरपद वाटून घेता आले तर शिंदे गट नक्की प्रयत्न करणार आहे. याचबरोबर स्थायी समित्यांची पदे देखील जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. यामुळे शिंदेंनी भाजपकडूनही दगाफटका नको म्हणून आपल्या नगरसेवकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Operation Lotus or Matoshree's Move? Shinde to Keep Winners in Hotel

Web Summary : Fearing poaching after BMC elections, Eknath Shinde plans to house his winning candidates in a hotel. With a close race for power and potential alliances forming, Shinde aims to prevent defections and secure key positions amidst BJP's dominance.
टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६शिवसेनाभाजपा