BMC Election Result 2026: मुंबईत होणार भाजपचा महापौर! उद्धवसेनेलाही मतदारांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 08:03 IST2026-01-17T06:19:35+5:302026-01-17T08:03:31+5:30
उद्धवसेनेला मराठी मतदारांची साथ मिळाल्याचेही निकालातून समोर आले आहे.

BMC Election Result 2026: मुंबईत होणार भाजपचा महापौर! उद्धवसेनेलाही मतदारांची पसंती
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक ९ वर्षानी पार पडली. या पालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच जोर सत्ताधारी शिंदेसेना एकानेजर मदानात उत्तरी भाजमहादिकास आघाडीतील उद्धवसेनेने मनसेसोबत जवळीक साधल्याने काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली. यामुळे निवडणुकीत तिरंगी लढत झाली. यात सर्वाधिक जागा जिंकून भाजप मोठा पक्ष ठरला. तर, उद्धवसेनेला मराठी मतदारांची साथ मिळाल्याचेही निकालातून समोर आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मुंबई निवडणूक प्रभारी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम व भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मुंबई पालिकेत २५ वर्षापासून सत्तेत असलेल्या उद्धवसेनेच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे प्रामुख्याने मांडले. सोबतच विकास, स्थैर्य आणि डबल इंजिन सरकारचा प्रचार प्रभावीपणे मांडत सर्वाधिक जागा जिंकल्या आणि मुंबईत मोठा पक्ष म्हणून स्थान पक्के केले.
दुसरीकडे, उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे आणला. उद्धवसेना या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, मराठी मुद्दयाला धार मिळाली असली तरी त्याचे रूपांतर जागा निवडून आणण्यात झाले नाही. असे असले तरीही मनसेने पुन्हा कम बॅक केल्याचे दिसले. काँग्रेसलाही वंचितसोबत लढण्याचा फारसा फायदा झाला नाही. काँग्रेसने काही प्रभागांत ताकद दाखवली. तर अनेक ठिकाणी काँग्रेसची मते 'कट वोट' ठरली. मात्र, मुस्लीम मतदारांनी काँग्रेसवर पुन्हा विश्वास दाखवला हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे. समाजवादी पक्ष, एमआयएम यांच्याकडे सक्षम नेतृत्व नसतानाही मुस्लीमबहुल भागात त्यांनी जागा जिंकल्या. मात्र, राष्ट्रवादी (अजित पवार) व राष्ट्रवादी (शरद पवार) यांना मतदारांनी आपलेसे केले नाही. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदारांचा कल भाजपकडे राहिला असल्याचे निकालावरून दिसून आले.
मुंबईचा महापौर हा हिंदू-मराठी होणार असे भाजपने स्पष्ट केले होते. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर महापौर कोण असेल, याकडे लक्ष लागले आहे.
मुंबईत शिंदेसेना बँक फूटवर
उद्धवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. त्यांना शिंदेसेनेने पुन्हा संधी दिली होती. भाजपसोबत युती असल्याने शिंदेसेनेच्या अधिक जागा निवडून यायला हव्या होत्या. मात्र, शिंदेसेना तिसऱ्या क्रमांकावर गेली. भाजपची मराठी मते पूर्णपणे शिंदेसेनेला मिळाली नाहीत. ती कुठे गेली याचा शोध शिंदेसेनेला घ्यावा लागणार आहे. शिंदेसेनेच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांच्या व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत गेलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नातेवाइकांचा पराभव झाला. यामुळे पक्ष बदल करणाऱ्यांना मुंबईकरांनी धडा शिकविल्याचेच मानले जाते. तर दुसरीकडे लोकसभा व विधानसभेला मुस्लिम मतदारांनी उद्धवसेनेला दिलेली साथ सोडल्याचे दिसून आले.
भाजप ८९
शिंदेसेना २९
उद्धवसेना ६५ मनसे ६
काँग्रेस २४
राष्ट्रवादी अजित पवार ३
राष्ट्रवादी शरद पवार १
समाजवादी पक्ष २
एमआयएम ८
इतर 0