K. Annamalai First Reaction On BMC Election 2026 Result: मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही, तर ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख करत वादग्रस्त विधान भाजपाचे नेते के. अण्णामलाई यांनी केले होते. ऐन मुंबई मनपा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना असे विधान केल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह विरोधकांनी के. अण्णामलाई यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यानंतर आता मुंबईत भाजपाला विजयी आघाडी मिळाली असून, ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. मुंबई मनपा निवडणुकीचे बहुतांश निकाल हाती आल्यानंतर आता के. अण्णामलाई यांनी पहिली स्पष्ट प्रतिक्रिया दिली.
२२७ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा-शिंदेसेना, ठाकरे बंधू किती जागांवर विजयी?
अण्णामलाई यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. भाजपचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला, त्यावर आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे काय म्हणणे आहे? फडणवीस म्हणतात; सूर्य-चंद्र-तारे असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राची असेल. पण, तुमचे नेते मात्र अशी वक्त्तव्य करतात. असा अण्णा, भन्ना, झंना, कुणी असो त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे, असे राऊत म्हणाले होते. राज ठाकरे यांनीही ठाण्याच्या सभेत अण्णामलाई यांचा उल्लेख ‘रसमलई’ करत टीकेची झोड उठवली होती. मुंबई मनपा निवडणुकीत आता उद्धवसेना ६५ जागांवर आघाडीवर असून, यातील बहुतांश जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. तर मनसे केवळ ६ जागांवर आघाडीवर असून, अवघे काही उमेदवार विजयी झाले आहेत.
के. अण्णामलाई मुंबईत भाजपाच्या विजयानंतर स्पष्टच बोलले
महाराष्ट्राच्या जनतेने निर्णायक कौल दिला आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेले घवघवीत यश हे उद्देशपूर्ण आणि कामगिरी यावर आधारित असून, हा एक जोरदार जनादेश आहे. गावा-गावांपासून ते महानगरांपर्यंत लोकांचा ट्रिपल इंजिन सरकारवरील हा विश्वास प्रगतीच्या राजकारणाचा पुरावा आहे, निराधार फुटीरतावादी प्रचाराचा नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. महाराष्ट्रातील भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांचेही अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनकारी दृष्टिकोनामुळे प्रेरित होऊन महाराष्ट्र वेगाने एक जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे, अशी पोस्ट के. अण्णामलाई यांनी एक्सवर केली आहे.
दरम्यान, मला धमकी देणारे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे कोण आहेत? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्या लोकांनी (ठाकरे बंधू) फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा बोलवली होती. मलाही माहिती नव्हते की मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. जर मी म्हणत असेन की कामराज हे भारताचे सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत. तर याचा अर्थ असा होतो का की ते तमिळ राहिले नाहीत? त्याचप्रमाणे मी जर म्हणतोय की मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. तर त्याचा अर्थ असा होतो का की महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केलेली नाही? अशा शब्दांत के. अण्णामलाई यांनी राज यांच्या टीकेला उत्तर दिले होते.
Web Summary : After BJP's Mumbai win, K. Annamalai defended his 'Bombay' comment, facing criticism from Thackeray brothers and Sanjay Raut. He asserted Mumbai's international status and praised the Mahayuti alliance's victory as a mandate for progress.
Web Summary : भाजपा की मुंबई जीत के बाद, के. अन्नामलाई ने अपने 'बॉम्बे' टिप्पणी का बचाव किया, ठाकरे बंधुओं और संजय राउत से आलोचना का सामना करना पड़ा। उन्होंने मुंबई की अंतर्राष्ट्रीय स्थिति पर जोर दिया और महायुति गठबंधन की जीत को प्रगति के लिए जनादेश बताया।