उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:32 IST2025-12-30T12:39:52+5:302025-12-30T13:32:07+5:30

मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंकडून अमराठी उमेदवारांना देखील संधी देण्यात आली आहे.

BMC Election 2026 Shiv Sena UBT and MNS Reach Out to Non Marathi Voters with New Candidate Lists | उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?

उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?

BMC Eelection 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी माणूस आणि मराठी अस्मिता या मुद्द्यांवरून दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र येत युतीची घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मराठीच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगत मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असंही म्हटलं. मात्र आता उद्धवसेना आणि मनसेच्या उमेदवारांच्या यादीत अमराठी चेहऱ्यांचा समावेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आतापर्यंत ८ अमराठी उमेदवारांना, तर राज ठाकरे यांच्या मनसेने सहा अमराठी उमेदवारांना संधी दिली आहे.

युतीची घोषणा करताना पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही ठाकरेंनी मुंबई वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र यंदाच्या पालिका निवडणुकीच्या उमेदवार यादीत दोन्ही पक्षांनी अमराठी उमेदवारांना संधी दिली.

उद्धव ठाकरेंनी आपल्या आतापर्यंतच्या यादीत ८ अमराठी नावे समाविष्ट केली आहेत. यामध्ये उत्तर भारतीय, अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांचा समावेश आहे. उत्तर मुंबई आणि उपनगरातील गुजराती-हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपला रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

ठाकरेंचे अमराठी उमेदावर

प्रभाग क्रमांक २२७ रेहाना गफूर शेख, प्रभाग क्रमांक १३४ सकीना बानू, प्रभाग क्रमांक १२४ सकीना शेख, प्रभाग क्रमांक ६२ झीशान चंगेज मुलतानी, प्रभाग क्रमांक ६४ सबा हारून खान, प्रभाग क्रमांक ५६  लक्ष्मी भाटिया, प्रभाग क्रमांक १  फोरम परमार, प्रभाग क्रमांक ४  राजू मुल्ला 

दुसरीकडे, राज ठाकरे यांनी नेहमीच मराठीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला असला, तरी यंदा त्यांनी आपल्या पहिल्या काही याद्यांमध्ये सहा अमराठी चेहऱ्यांना संधी दिली आहे. 

यामध्ये वॉर्ड क्र. ११५  ज्योती अनिल राजभोज, वॉर्ड क्र. २०७ शलाका आरयन, वॉर्ड क्र. १३९ शिरोमणी येशू जगली,  वॉर्ड क्र. २१ मधून सोनाली देव मिश्रा, वॉर्ड क्र. ८१ मधून शबनम शेख आणि वॉर्ड क्र. ११० मधून हरिनाक्षी मोहन चिराथ यांना संधी दिली आहे.

राज ठाकरेंच्या उमेदवारांची यादी
 
१. वार्ड क्र. ८ - कस्तुरी रोहेकर
२. वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील
३. वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने
४. वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे
५. वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी
६. वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा
७. वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर
८. वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके
९. वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे
१०. वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव
११. वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी
१२. वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई
१३. वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख
१४. वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी
१५. वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते
१६. वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे
१७. वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी
१८. वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ
१९. वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज
२०. वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते
२१. वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव
२२. वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली
२३. वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे
२४. वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे
२५. वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळे
२६. वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके
२७. वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार
२८. वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी
२९. वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी
३०. वॉर्ड क्र. २०७ – शलाका आरयन
३१. वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर
३२. वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव
३३. वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर
३४. वॉर्ड क्र. २२६ – बबन महाडिक
३५. वार्ड क्र. ३६ - प्रशांत महाडिक
३६. वार्ड क्र. २१६ - राजश्री नागरे
३७. वार्ड क्र. २२३ - प्रशांत गांधी

उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची यादी

१) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार
२) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे
३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
४) प्रभाग क्रमांक ४ – राजू मुल्ला
५) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
६) प्रभाग क्रमांक ७ – सौरभ घोसाळकर
७) प्रभाग क्रमांक ९ – संजय भोसले
८) प्रभाग क्रमांक १२ – सारिका झोरे
९) प्रभाग क्रमांक १३ – आसावरी पाटील
१०) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर
११) प्रभाग क्रमांक २५ – माधुरी भोईर
१२) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
१३) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
१४) प्रभाग क्रमांक ४१ – सुहास वाडकर
१५) प्रभाग क्रमांक ४७ – शंकर गुरव
१६) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
१७) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
१८) प्रभाग क्रमांक ५६ – लक्ष्मी भाटिया
१९) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
२०) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
२१) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
२२) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
२३) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
२४) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
२५) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
२६) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
२७) प्रभाग क्रमांक ७५ – प्रमोद सावंत
२८) प्रभाग क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर
२९) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
३०) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
३१) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
३२) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
३३) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
३४) प्रभाग क्रमांक १०९ – सुरेश शिंदे
३५) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
३६) प्रभाग क्रमांक ११४ – राजोल पाटील
३७) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
३८) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
३९) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे
४०) प्रभाग क्रमांक १२२ – निलेश साळुंखे
४१) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
४२) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
४३) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार
४४) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
४५) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
४६) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे
४७) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
४८) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू
४९) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
५०) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
५१) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
५२) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
५३) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
५४) प्रभाग क्रमांक १४४ – निमिष भोसले
५५) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
५६) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
५७) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
५८) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
५९) प्रभाग क्रमांक १५७ – डॉ. सरिता म्हस्के
६०) प्रभाग क्रमांक १५८ – चित्रा सोमनाथ सांगळे
६१) प्रभाग क्रमांक १६० – राजेंद्र पाखरे
६२) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
६३) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
६४) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू 
६५) प्रभाग क्रमांक १७३ – प्रणिता वाघधरे
६६) प्रभाग क्रमांक १७९ – दीपाली खेडेकर
६७) प्रभाग क्रमांक १८० – अस्मिता गावकर
६८) प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य
६९) प्रभाग क्रमांक १८४ – वर्षा वसंत नकाशे
७०) प्रभाग क्रमांक १८५ – टी. एम. जगदीश
७१) प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी
७२) प्रभाग क्रमांक १८९ – हर्षला मोरे
७३) प्रभाग क्रमांक १९० – वैशाली पाटील
७४) प्रभाग क्रमांक १९१ – विशाखा राऊत
७५) प्रभाग क्रमांक १९४ – निशिकांत शिंदे
७६) प्रभाग क्रमांक १९५ – विजय भणगे
७७) प्रभाग क्रमांक १९६ – पद्मजा चेंबूरकर
७८) प्रभाग क्रमांक १९८ – अबोली खाड्ये
७९) प्रभाग क्रमांक १९९ – किशोरी पेडणेकर
८०) प्रभाग क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ
८१) प्रभाग क्रमांक २०१ – रेखा कांबळे
८२) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
८३) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
८४) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
८५) प्रभाग क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे
८६) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ
८७) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
८८) प्रभाग क्रमांक २१९ – राजेंद्र गायकवाड
८९) प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर
९०) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
९१) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
९२) प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख

Web Title : ठाकरे बंधुओं ने बीएमसी चुनावों के लिए गैर-मराठी उम्मीदवारों को मौका दिया

Web Summary : ठाकरे बंधुओं की पार्टियों ने आगामी बीएमसी चुनावों में गैर-मराठी उम्मीदवारों को मैदान में उतारा है। शिवसेना (उद्धव) ने आठ और मनसे ने छह उम्मीदवारों को नामांकित किया है, जो मुंबई के राजनीतिक परिदृश्य में समावेशिता की ओर एक बदलाव का संकेत है।

Web Title : Thackeray Brothers Extend Hand to Non-Marathi Candidates for BMC Elections

Web Summary : Breaking tradition, the Thackeray brothers' parties are fielding non-Marathi candidates in the upcoming BMC elections. Shiv Sena (Uddhav) has nominated eight, while MNS has nominated six, signaling a shift towards inclusivity and broader appeal in Mumbai's political landscape.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.