फोटो कॉपी एबी फॉर्म प्रकरणी सुनावणीस नकार; मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 09:08 IST2026-01-06T09:08:11+5:302026-01-06T09:08:52+5:30
केळुसकर यांच्याविरोधात सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फोटो कॉपी एबी फॉर्म प्रकरणी सुनावणीस नकार; मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर यांच्याविरोधात निवडणुकीसंदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.
मुंबई महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १७३ मधून भाजप उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी कलर फोटो कॉपी केलेला एबी फॉर्म भरल्याचा प्रकार उघडकीस आला. निवडणूक आयोगानेही त्यांचा अर्ज ग्राह्य धरला. मात्र, त्यानंतर केळुसकर यांच्याविरोधात सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, हा फॉर्म ज्यांना मिळणार होता त्या .पूजा कांबळे आणि त्यांचे पती रामदास कांबळे यांनी या प्रकाराबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली. मुख्य न्या. चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिला. या टप्प्यावर तुमची मदत करू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने कांबळे यांना दिलासा देण्यास नकार दिला.