राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:30 IST2025-12-19T16:30:15+5:302025-12-19T16:30:26+5:30
MNS Raj Thackeray News: एकीकडे उद्धवसेनेशी युती, जागावाटपाची चर्चा सुरू असताना, राज ठाकरे मुंबईतील अनेक शाखांना भेटी देणार आहेत.

राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
MNS Raj Thackeray News: मुंबईसह राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. उद्धवसेनेचे संजय राऊत व अनिल परब यांनी शिवतीर्थ येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. युतीची घोषणा व जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा अनिल परब यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. चर्चेच गुऱ्हाळ सुरू असताना राज ठाकरे आता शाखा भेटींवर भर देणार आहेत. केवळ दोन दिवसांत मुंबई शहर पिंजून काढणार असून, राज ठाकरे कुठे, कधी भेटी देणार आहेत, याचा एक कार्यक्रमच समोर आला आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईसह अन्य महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार अशी चर्चा होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत जागावाटपाबाबत चर्चाही सुरू केली. उद्धवसेनेने ११० तर, मनसेने मुंबईतील ३६ विधानसभेत प्रत्येकी २ जागांसह एकूण ८० जागांची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत, अनिल परब यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे ४० मिनटे चर्चा झाली. यानंतर आता मनसेने कंबर कसून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांमुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह वाढल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईतील काही कार्यालयांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जाणार आहेत. शनिवारी आणि रविवारी राज ठाकरेंचा दौरा ठरला आहे.
राज ठाकरे शनिवारी मुंबईत कोणत्या ठिकाणी कधी भेट देणार?
१) शाखा क्रमांक १०९ कार्यालयाचा पत्ता-वाघेश्वरी मित्र मंडळ जवळ, वाघोबावाडी, जयशंकरनगर, तुलशेतपाडा, भांडुप (प).
२) शाखा क्रमांक ११३ कार्यालयाचा पत्ता- शॉप नंबर २, ब्रह्मानंद निवास, गणेश नगर, नवजीवन शाळा रोड, भांडुप पश्चिम, मुंबई.
३) शाखा क्रमांक १४१ कार्यालयाचा पत्ता-देवनार महापालिका वसाहत, श्रीस्वामी समर्थ मठ समोर देवनार गोवंडी मुंबई - ४३.
४) शाखा क्रमांक १४४ कार्यालयाचा पत्ता-कृष्णा नगर, राज कपूर चौक, सायन पनवेल महामार्ग, अणुशक्ती नगर उड्डाणपूल समोर, मानखुर्द, मुंबई.
५) कुर्ला विधानसभा कुर्ला गड मध्यवर्ती कार्यालय पत्ता-डी २, नेहरूनगर, सावली हॉटेल समोर, कुर्ला पूर्व, मुंबई.
६) सायंकाळी ५.०० वाजता शाखा क्रमांक २०७ कार्यालयाचा पत्ता-गोमतीबाई निवास, बकरी अड्डा, ना.एम. जोशी मार्ग, भायखळा, मुंबई.
७) सायंकाळी ५.३० वाजता मलबार हिल विधानसभा मध्यवर्ती कार्यालय दुकान क्रमांक ५, महापालिका मंडई, तुळशीवाडी, RTO मार्ग, ताडदेव, मुंबई.
राज ठाकरे रविवारी मुंबईत कुठे आणि कधी भेट देणार?
१) शाखा ५६ कार्यालयाचा पत्ता-राज पॅन्थिऑन बिल्डिंग, शॉप नंबर ५, न्यू सुभाष नगर, मोतीलाल नगर रोड क्र. ३, गोरेगाव प.
२) शाखा क्र ४६ कार्यालयाचा पत्ता- दुकान क्र ५, एच पी शॉपिंग सेंटर, मालाड (प)
३) शाखा क्र १८ कार्यालयाचा पत्ता- सत्यविजय को-ऑ सोसायटी, सेक्टर नंबर ५, प्लॉट नंबर ५५६, डी 12, बोरीवली प.
४) शाखा क्र १० कार्यालयाचा पत्ता- ४, दत्तात्रय भवन, एक्सर रोड, एक्सर मच्छी मार्केट, बोरिवली प. मुंबई ४०० १०३.
५) शाखा क्र ७ कार्यालयाचा पत्ता- रामचंद्र पावसकर मार्ग, मच्छी मार्केट जवळ, दहिसर प.
६) शाखा क्र ३६ कार्यालयाचा पत्ता- दुकान न. ९, मंथन दर्शन, दत्ता मंदिर रोड, सर्वोदय नगर, मालाड पूर्व.
७) शाखा क्र ३७ कार्यालयाचा पत्ता- छत्रपती शिवाजी महाराज नगर, कै. एकनाथ खेडेकर चौक, कुरार व्हिलेज, मालाड पूर्व.
८) शाखा क्र ७४ कार्यालयाचा पत्ता- JVLR, मातोश्री क्लब जवळ, जोगेश्वरी पूर्व.
