BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:15 IST2026-01-07T18:14:34+5:302026-01-07T18:15:55+5:30
BMC Electons 2026 Crime News: मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन भरात येत असतानाच एका उमेदवारावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.

BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
Mumbai Crime: मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवार निश्चित झाल्यामुळे प्रचाराचा पारा चढू लागला आहे. अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे. शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हाजी सलीम कुरेशी यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पोटात चाकू खुपसण्यात आला.
मुंबई महापालिका निवडणुकीची मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे. आठवडाभरावर मतदान येऊन ठेपले असून, उमेदवार आणि नेते पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. अशातच प्रचार करत असलेल्या उमेदवार प्राणघातक हल्ला करण्यात आला.
हाजी सलीम कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार हाजी सलीम कुरेशी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. ते मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९२ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
बुधवारी (७ जानेवारी) हाजी सलीम कुरेशी हे वांद्रे येथील ज्ञानेश्वर नगर येथे प्रचारासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.
हल्लेखोराने हाजी सलीम कुरेशी यांच्या पोटातच चाकू खुपसला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा आता पोलीस तपास करत आहेत.
हाजी सलीम कुरेशी हे शिंदेसेनेत आहेत. यापूर्वी ते असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षात होते. मुंबई महापालिका निवडणुकीआधी त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांना पक्षाकडून उमेदवारीही मिळाली.