मनसेच्या बंडखोर उमेदवार राज ठाकरेंना म्हणाल्या, साहेब धन्यवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:18 IST2026-01-08T11:18:38+5:302026-01-08T11:18:38+5:30
पूर्व उपनगरात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शाखा भेट भांडुपच्या प्रभाग क्रमांक ११४ मध्ये लक्षणीय ठरली.

मनसेच्या बंडखोर उमेदवार राज ठाकरेंना म्हणाल्या, साहेब धन्यवाद
मुंबई: पूर्व उपनगरात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शाखा भेट भांडुपच्या प्रभाग क्रमांक ११४ मध्ये लक्षणीय ठरली. या प्रभागात उद्धवसेनेचे खा. संजय पाटील यांची कन्या राजुल आणि मनसेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष व बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर रिंगणात आहेत.
राजुल यांच्या प्रचारासाठी राज यांचा ताफा जात असताना त्यांचे वाहन माजगावकर उभ्या असलेल्या ठिकाणी थांबला. घेण्यासाठी पुढे गेले, तेव्हा राज यांनी काच खाली करून त्यांना हात दाखवला. त्यावर माजगावकर म्हणाल्या, ‘साहेब, धन्यवाद!’ प्रभाग क्रमांक ११४ मध्ये पाटील, माजगावकर आणि शिंदेसेनेकडून सुप्रिया धुरत रिंगणात आहे. माजगावकर यांच्या बंडखोरीने राजकारण तापले आहे. त्यांच्यावर मनसेकडून कारवाई झालेली नसल्याने पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे अमित ठाकरे यांच्या शाखा भेटीनंतर राज यांनी राजुल यांच्या कार्यालयाला भेट देत शुभेच्छा दिल्या.