BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 17:56 IST2026-01-11T17:27:29+5:302026-01-11T17:56:40+5:30
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, आज जय जवान पथकातील गोविंदांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या जाहीर सभा सुरू आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, आता मुंबईतील सर्वात जुन्या आणि मानाच्या जय जवान गोविंदा पथकाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये जय जवान दहीहंडी पथकातील सुमारे एक हजार गोविंदांनी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. महायुतीनेही जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, आता निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. जय जवान गोविंदा पथकातील गोविंदा शिवसेनेत प्रवेश करार आहेत.
महायुतीने आज वचननामा जाहीर केला
भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचा वचननामा आज प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. सुमारे १५ ते १६ पानी वचननाम्यात मुंबईकरांना विविध आश्वासने देण्यात आली आहेत. या आश्वासनांची पूर्तता २०२९पर्यंत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रामदास आठवले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल ट्रेन आणि आता मुंबई मेट्रो याबाबत जाहीरनाम्यात विशेष बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
महायुतीचा पाताललोक... मुंबई मेट्रो
वचननाम्यात म्हटल्याप्रमाणे, कोस्टल रोड (टप्पा १) यातून मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा प्रवास वेगवाग करण्यासाठी मुंबईतील पहिला समुद्री बोगदा कार्यान्वित झाला आहे. मुंबई मेट्रो लाईन ३ (Aqua Line)चा कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा टप्पाही सुरु झाला आहे. मुंबईतील पहिली पूर्णतः 'अंडरग्राउंड' मेट्रो संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुली आहे. त्यातच भर म्हणून ठाणे-बोरीवली अंडरग्राउंड टनेल करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात आहे. ज्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा हा बोगदा बोरीवली आणि ठाण्यातील अंतर अवघ्या १०-१५ मिनिटांवर आणेल. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) सुरु केला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा महत्त्वाचा दुवा ठरेल, ज्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा हा पूर्व मुक्त मार्ग (Eastern Freeway) आणि कोस्टल रोडला जोडणारा भूमिगत मार्गही तयार केला जाईल, ज्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी पूर्णतः संपेल, असे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे.