मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:39 IST2025-12-30T12:27:58+5:302025-12-30T12:39:52+5:30
Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करून निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपली उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये ५६ नावांचा समावेश असून, त्यात अमराठी आणि मुस्लिम उमेदवारांना प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून येत आहे.

मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करून निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपली उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये ५६ नावांचा समावेश असून, त्यात अमराठी आणि मुस्लिम उमेदवारांना प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून येत आहे.
काँग्रेसने आज प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये मागाठाणे प्रभाग क्रमांक ३ येथून प्रदीप चौबे, गोरेगाव प्रभाग क्रमांक ५८ येथून सूर्यकांत मिश्रा, धारावी प्रभाग क्रमांक १८६ येथून सदिच्छा शिंदे, माहिम प्रभाग क्रमांक १९० येथून दयाशंकर यादव, वडाळा प्रभाग क्रमांक २०० येथून सुरेश काळे, शिवडी प्रभाग क्रमांक २०५ येथून अपूर्वा प्रवीण साळिस्तेकर तर मुंबादेवी प्रभाग क्रमांक २२३ येथून ज्ञानराज निकम यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, काल काँग्रेसने काल आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज प्रसिद्ध केली आहे. काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पहिल्या यादीत एकूण ८७ उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने आज प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये बहुतांश नव्या चेहऱ्यांचा समावेश होता. मुंबई महनगरपालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसने नंतर वंचित बहुजन आघाडीसोबत लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी काँग्रेस आणि प्रकास आंबेडकर यांचा पक्ष एत्र आला आहे. वंचित बहुजन आघाडीला मुंबई महानगरपालिकेतील २२७ पैकी ६२ जागा देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित जागांवर काँग्रेस आणि काँग्रेसचे इतर मित्र पक्ष निवडणूक लढणार आहेत.