CM Devendra Fadnavis PC News: राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी सुरू आहे. पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. यातून अनेक आश्वासने दिली जात आहे. मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजपा-शिंदेसेनेच्या महायुतीने आपला वचननामा जाहीर केला. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधत लाडकी बहीण योजनेतील निधीचे वितरण थांबू शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही पण महानगर पालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरीत करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबतचे पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगला पाठवले आहे. काँग्रेसने पाठवलेल्या या पत्राबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.
काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत
काँग्रेस आणि आमचे विरोधक पहिल्या दिवसापासून आमच्या लाडक्या बहिणींना विरोध करत आहेत. मागच्या काळात आम्ही जेव्हा योजना सुरू केली, तेव्हा ही योजना बंद करा, अशी मागणी घेऊन उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयात त्यांना दाद मिळाली नाही. आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकू नका म्हणतात. लाडकी बहीण योजना सुरू असलेली योजना आहे. सगळ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये म्हटले आहे की, कोणतीच सुरू असलेली योजना थांबवता येत नाही. त्यामुळे त्यांनी कितीही पत्र लिहिली, तरी त्यातून त्यांचे लाडक्या बहिणींबद्दल असलेले विषच बाहेर येईल. पण लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाहीत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भाजपा-शिंदेसेना महायुती लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करणार
- लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी व लघु उद्योग स्थापन करण्यासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार.
- महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विकण्याकरिता e-martket स्थापन करणार.
- कामकरी महिलांसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये परवडणाऱ्या दरात 'म्युनिसिपल क्रेच' (पाळणाघर) सुविधा उपलब्ध करून देणार.
- मुंबईत महिलांसाठी मुबलक शौचालय बांधणार.
- महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज आणि त्यांचे उत्पादन विकण्यासाठी शहरात 'हक्काचे वेंडिंग झोन' उभारणार.
- 'मुंबई डिजिटल सखी' अंतर्गत महिलांना एआय (AI), कोडिंग आणि ऑनलाइन मार्केटिंगचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी लॅब उभारणार.
- महिलांच्या सुरक्षिततेसाठी 'रात्रीचे गस्त पथक' (Night Patrol Squads) आणि त्वरित मदतीसाठी वन-टॅप मोबाईल अॅप बनवणार तसेच ड्रोन पॅट्रोलिंग करणार.
- शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण (Self Defense) अभ्यासक्रमात समाविष्ट करणार.
- महिला बचत गटांसाठी ३०,०००/- अनुदान देण्याचे प्रस्तावित आहेत. सध्या मनपा माध्यमातून २०,०००/- दिले जातात.
Web Summary : CM Fadnavis assures Ladki Bahin Yojana funds will continue despite Congress's opposition. BJP-Shinde Sena promises interest-free loans, e-markets, and safety measures for women's empowerment in Mumbai.
Web Summary : सीएम फडणवीस ने आश्वासन दिया कि कांग्रेस के विरोध के बावजूद लाडली बहिन योजना का धन जारी रहेगा। बीजेपी-शिंदे सेना ने मुंबई में महिलाओं के सशक्तिकरण के लिए ब्याज मुक्त ऋण, ई-मार्केट और सुरक्षा उपायों का वादा किया।