भाजप-उद्धव सेनेचे कार्यकर्ते साकीनाक्यात भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:05 IST2026-01-08T09:05:11+5:302026-01-08T09:05:44+5:30
संघर्षनगर येथे उद्धव सेनेच्या गटाची चौक सभा होती.

भाजप-उद्धव सेनेचे कार्यकर्ते साकीनाक्यात भिडले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : साकीनाक्याच्या चांदिवली येथील संघर्षनगर परिसरात आयोजित उद्धवसेनेच्या चौक सभेत भाजप कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याची घटना ६ जानेवारीला रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींमध्ये भाजपच्या विजू कोळी, वैशाली वैताडे, अनिष जाधव, सचिन जाधव तर उद्धव सेनेच्या राहुल सुर्वे यांचा समावेश आहे.
संघर्षनगर येथे उद्धव सेनेच्या गटाची चौक सभा होती. सभेसाठी खुर्च्यांची मांडणी केली जात असताना भाजपच्या उमेदवार आशा तायडे यांच्या प्रचारासाठी आलेले काही कार्यकर्ते सभास्थळी मागील बाजूने आले आणि गोंधळ सुरू झाला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मारहाणीत भाजप कार्यकर्ते विजू कोळी, वैशाली वैताडे, अनिष जाधव आणि सचिन जाधव यांचा सहभाग असल्याचा दावा उद्धवसेनेचे राहुल सुर्वे यांनी केला. दरम्यान, साकीनाका पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांची पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती आहे.