BMC Budget 2021 updates live : ३९ हजार कोटींचं बजेट सादर, मालमत्ता करात सरसकट माफी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 03:44 PM2021-02-03T15:44:37+5:302021-02-03T15:59:04+5:30

BMC Budget 2021 updates live : मुंबई महानगरपालिकाचा सन २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प आज पालिका सभागृहात सादर करण्यात आला

BMC Budget 2021 updates live 39 thousand crore budget presented no property tax waiver in mumbai | BMC Budget 2021 updates live : ३९ हजार कोटींचं बजेट सादर, मालमत्ता करात सरसकट माफी नाही

BMC Budget 2021 updates live : ३९ हजार कोटींचं बजेट सादर, मालमत्ता करात सरसकट माफी नाही

Next

BMC Budget 2021 updates live : मुंबई महानगरपालिकाचा सन २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प आज पालिका सभागृहात सादर करण्यात आला आहे. कोरोना आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मुंबई पालिकेनं यंदा ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षीचा मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प ३३ हजार ४४१ कोटी इतकं होतं. यावेळी त्यात १६.७४ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मालमत्ता करात सरसकट माफी मिळणार का? याकडे सर्वसामान्य मुंबईकरांचं लक्ष लागून होतं. पण महापालिकेकडून त्यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मालमत्ता करातील सर्वसाधारण करच सध्या माफ आहे. इतर नऊ प्रकारचे कर लागू आहेत. त्यानुसारच तूर्तास २०१९-२० प्रमाणेच मालमत्ता कराची बिले पाठवण्यात येत आहेत. त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. 

मुंबईतील पालिका शाळांचं 'मुंबई पब्लिक स्कूल' असं नामांतर होणार; यामागचं कारण काय?

मालमत्ता करातून मुंबई पालिकेला ६७६८.५८ कोटी उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. परंतु सुधारित अर्थसंकल्पानुसार आता साडेचार हजार कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा होतील, असं चहल यांनी यावेळी सांगितलं. सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या उत्पन्नात २२६८.५८ कोटींची घट झाली आहे. उत्पन्नाचे दुसरे प्रमुख स्त्रोत असलेल्या विकास नियोजन खात्यातून ३८७९.५१ कोटी उत्पन्न अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत केवळ ११९९.९९ कोटी उत्पन्न जमा झाले आहे. एस.आर.ए कडून महापालिकेला जमीन अधिमूल्य पोटी ६१८ कोटी व पायाभूत सुविधा विकास आकारामुळे ९८२ कोटी येणे आहे. तसेच राज्य शासनाकडून विविध  कार्यालयांकडून ५२७४ कोटी येणे बाकी असल्याचीही माहिती चहल यांनी दिली. 

( BMC Budget 2021 updates) मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे... 

>> नायर रुग्णालयात लवकरच १.५ टेस्ला एमआरआय सुविधा उपलब्ध करून देणार ; 
१७ ते २० कोटींची तरतूद

>> लिक्विड ऑक्सिजन टॅंक उपलब्धतेसाठी  कोविड फंडातून ४०.३० कोटींची तरतूद

>> ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासण्या घरातच करण्यासाठी विशेष धोरण - पाच कोटी रुपयांची तरतूद

>> नर्सिंग प्राध्यापक संवर्गातील मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी  २० कोटींची तरतूद

>> संसर्गजन्य रोगांसाठी २०३० पर्यंत १०० टक्के बालकांचे लसीकरण करणार

>> कस्तुरबा रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात येणार

>> नवीन इमारतींना अग्नी व जीव संरक्षण व्यवस्था या अनुषंगाने परवानगी देण्याकरिता महापालिकेतर्फे छाननी शुल्क आकारले जाते. या शुल्कात मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन

>> देवनार पशुवध गृहाच्या आधुनिकीकरणासाठी ३० कोटी रुपयांचा निधी

>> कोस्टल रोडसाठी दोन हजार कोटी, गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यासाठी १३०० कोटी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात कचऱ्यापासून  वीजनिर्मिती करता एक हजार 119 कोटी

>>  सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी 1339. 94 कोटी, मोठ्या जलवाहिन्यांची कामे २२९.५० कोटी, मिठी नदी प्रकल्पची कामे ६७ कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे

>> आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमासाठी महापालिकेने आगामी आर्थिक वर्षात ७५० कोटी तरतूद

Web Title: BMC Budget 2021 updates live 39 thousand crore budget presented no property tax waiver in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.