तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक एका क्लिकवर...

By नितीन जगताप | Published: December 9, 2023 01:19 AM2023-12-09T01:19:09+5:302023-12-09T01:20:14+5:30

पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Block on Sunday on all three railway lines | तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक एका क्लिकवर...

प्रतिकात्मक फोटो

मुंबई : उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रविवार,१० डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वे
कुठे : ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर 
कधी - सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यत
परिणाम - ब्लॉक दरम्यान ठाणे ते कल्याण दरम्यानची जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरुन वळविण्यात येणार आहे. परिणामी या मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच सीएसएमटी-दादर स्थानकातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या मेल- एक्सप्रेस ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या -सहाव्या रेल्वे मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे
कुठे  -  हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान 
कधी - सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यत 
परिणाम -यादरम्यान कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यानची लोकल सेवा पुर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यत ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी-नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वे
कुठे - मुंबई सेंट्रल ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर
कधी - शनिवारी रात्री  ११ ते रविवारी पहाटे ४ वाजेपर्यत 
परिणाम - ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते चर्चगेट दरम्यान धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.
 

Web Title: Block on Sunday on all three railway lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.