मुंबईत भाजपाच्या विजय संकल्प बाईक रॅलीला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 18:58 IST2019-03-03T18:53:51+5:302019-03-03T18:58:55+5:30
मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदार संघात भाजपाच्या विजय संकल्प बाईक रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबईत भाजपाच्या विजय संकल्प बाईक रॅलीला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद
मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदार संघात भाजपाच्या विजय संकल्प बाईक रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विजय लक्ष्य 2019 च्या अनुषंगाने भाजपाने राज्यासह देशात विविध कार्यक्रम राबवण्याचा निश्चय केला आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी (3 मार्च) रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदार संघात विजय संकल्प रॅली या घोषवाक्याप्रमाणे महा बाईक रॅली काढण्यात आली. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदार संघात निघालेल्या बाईक रॅलीत सुमारे 500 बाईक सहभागी झाल्या होत्या.
भाजपाने मुंबईत मेरा परिवार भाजपा परिवार आणि कमल ज्योती संकल्प ही अभियाने देखील नुकतेच प्रभावीपणे राबवली. मेरा परिवार, भाजपा परिवार या अभियानात मुंबईतील प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांच्या घराबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र असलेले स्टीकर्स चिटकवण्यात येत असून, मेरा परिवार भाजपा परिवार, फिर एक बार मोदी सरकार असा मथळा या स्टीकर्सवर यावर लिहिलेले आहे. भाजपा कार्यकर्त्यांच्या घराबाहेर भाजपाचा झेंडा निर्देशित करण्यात आला आहे. तसेच शासकीय योजनांचे लाभार्थी असल्याच्या घराबाहेर कमळाची मोठी रांगोळी देखील काढण्याचा उपक्रम गेल्या बुधवारी राबवण्यात आला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर हे मुंबई उपनगरात येत असून आज सायंकाळी ते बुद्धीजीवी संमेलनात ते भाष्य करणार आहेत.